Gautami Patil : ‘समोर बसलेली पण माहिती नव्हतं तो माझा बाप…’, गौतमी पाटीलचं मोठं वक्तव्य

Gautami Patil : गौतमी पाटील हिचं नाव जरी घेतलं तरी, अनेकांना तिचा डान्स आठवतो. स्टेजवर गौतमी प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसते. पण खासगी आयुष्यात गौतमी हिने अनेक चढ - उतारांचा सामना केला आहे. गौतमी कायम तिच्या खासगी आयु्ष्याबद्दल सांगत असते.

Gautami Patil : समोर बसलेली पण माहिती नव्हतं तो माझा बाप..., गौतमी पाटीलचं मोठं वक्तव्य
गौतमी पाटील
| Updated on: Nov 03, 2026 | 3:41 PM

Gautami Patil : सबके कातिल गौतमी पाटील… असं म्हणते चाहते गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमासाठी गर्दी करतात. गौतमी हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. पण तिच्यासाठी हा प्रवास फार कठीण होता. परिस्थिती बिकट असल्यामुळे गौतमी फक्त 10 वीच शिकली, त्यात वडिलांची नसलेली साथ गौतमी आणि तिच्यासाठी आईसाठी फार मोठी संघर्ष होता. नुकताच गौतमी हिने तिच्या वडिलांबद्दल मोठा खुलासा केला. वडील समोर बसलेले असताना देखील गौतमीला हिला तिच्या वडिलांना ओळखता आलं नाही, तर वडिलांना देखील माहिती नव्हतं, समोर बसलेली त्यांची मुलगी आहे.

मुलाखतीत गौतमी पाटील म्हणालेली, ‘मला माहिती नव्हतं माझे वडील कोण आहे, त्यांनी मी ओळखत नव्हती. माझ्या वडिलांना मी कधी पाहिलंच नाही. मी माझ्या आईसोबतच राहत होते. माझ्या आजोबांनी माझा सांभाळ केला. आईचे वडील, आई आणि मी गावाकडे राहत होतो. वडिलांकडे तर मी कधी गेलेच नाही… आजोबांनीच मला लहानाचं मोठं केलं. पण कुटुंबाचा विचार असायचाच. पुढे माझ्या आईचं काय होईल, माझं काय होईल. म्हणून मी आठवीत असताना माझ्या बाबांनी वडिलांना बोलावून घेतेलं…’

Loading...

‘माझ्या समोर वडिलांना बसवलं होतं. माझ्या आजोबांनी मला विचारलं ‘हे कोण आहेत?’, माझ्या वडिलांना विचारलं, ‘या आठवीतल्या मुलीला ओळखता का?’ मी माझ्या वडिलांना ओळखत नव्हती… माझ्या समोर बसलेले माझे वडील आहे, हे मला माहिती नव्हते…’

‘मी वडिलांना कधीच पाहिलं नव्हतं. मी आईकडे खूप रडले, की माझे वडील कोण आहेत? कारण शाळेत सर्वांचे वडील यायचे, फक्त माझे वडील नसायचे. तेव्हा मी आईला विचारायचे माझे वडील कुठे आहेत. तेव्हा मला कारण सांगून मला आईने समजावलं..’

पुढे गौतमी म्हणाली, ‘माझ्या मामाने आम्हाल पुण्यात आणलं, म्हणजे मला, माझ्या आई – वडिलांना.. इकडे एकत्र राहा आणि नव्याने सुरुवात करा या हेतूने… पण माझे वडील कधी सुधारलेच नाहीत. ते सतत माझ्या आईला मारायचे. मी शाळेत, क्लासला गेले तर, ते माझ्या मागे यायचे, मी कुठे जात आहे पाहण्यासाठी. तेव्हा बोलायचे ही माझी मुलगी नाही. नशेत असायचे म्हणून बोलायचे… पण माझ्या आईने प्रत्येक वेळेस फक्त माझा विचार केला आहे.’, असं खुद्द गौतमीने एक मुलाखतीत सांगितलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us