जिनिलिया देशमुखला ‘छावा’ची भूरळ! विकी कौशलचं कौतुक करत झाली भावूक, म्हणाली…

सध्या सगळीकडे 'छावा' सिनेमाची चर्चा सुरू आहे. नुकताच हा चित्रपट अभिनेत्री जिनिलिया डिसूजाने पाहिला. हा चित्रपट पाहून जिनिलियाने पोस्ट केली आहे.

जिनिलिया देशमुखला छावाची भूरळ! विकी कौशलचं कौतुक करत झाली भावूक, म्हणाली...
Vicky and Genelia
Image Credit source: Instagram
| Updated on: Feb 21, 2025 | 11:30 AM

गेल्या काही दिवसांपासून ‘छावा’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्री रश्मिका मंदाना महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर देखील धुमाकूळ घालताना दिसत आहे. प्रदर्शनाच्या सात दिवसांमध्ये चित्रपटाने जवळपास २०० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. दरम्यान, अभिनेत्री जिनिलिया डिसूजाने केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे. ही पोस्ट करत जिनिलिया भावूक झाली आहे. आता नेमकं जिनिलिया काय म्हणाली चला जाणून घेऊया…

सर्वसमान्यांपासून ते बड्या कलाकारांपर्यंत सर्वजण ‘छावा’ चित्रपटाचे तोंडभरून कौतुक करताना दिसत आहेत. त्यामध्ये आलिया भट्ट, करण जोहर, आयुष्मान खुराना, राजकुमार राव आणि इतर काही कलाकारांचा समावेश आहे. आता अभिनेत्री जिनिलिया देशमुखने ‘छावा’ सिनेमा पाहिल्यानंतर विकी कौशलचे कौतुक केले आहे. त्यासोबतच तिने भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

Chava movie post

काय आहे जिनिलियाची पोस्ट?

जिनिलियाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला ‘छावा’ सिनेमाशी संबंधीत पोस्ट शेअर केली आहे. “प्रेक्षकांसाठी असे काही कलाकार असतात ज्यांच्याकडून नेहमीच सकारात्मक अपेक्षा असतात. हे कलाकार काहीतरी चांगलंच करणार असे वाटत असते. विकी कौशल माझ्यासाठी तसा अभिनेता आहे. त्याची मेहनत, जिद्द, प्रामाणिकपणा खूप काही सांगून जातो. ऑनस्क्रीन विकी ज्याप्रकारे भूमिका साकारतो, यात त्याने घेतलेली मेहनत दिसून येत आहे. खूप अभिनंदन विकी कौशल, रश्मिका मंदाना, मॅडडॉक फिल्म्स, लक्ष्मण उतेकर, अक्षय खन्ना आणि या चित्रपटाच्या संपूर्ण टीमचं खूप अभिनंदन! तुम्हाला सर्वांना खूप खूप प्रेम” या आशयाची ही पोस्ट आहे.

‘छावा’ सिनेमाविषयी बोलायचे झाले तर हा सिनेमा १४ फेब्रुवारी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाने ‘जवान’, ‘पठाण’, ‘पुष्पा’ यांसारख्या सिनेमांना कमाईच्या बाबतीत मागे टाकले आहे. स‌ॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, ‘छावा’ सिनेमाच्या पहिल्या दिवसाची कमाई ही ३१ कोटी रुपये होते. आता या कमाईमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. शिवजंयतीच्या मूहुर्तावर चित्रपटाने बक्कळ कमाई केली आहे. चित्रपटाने सात दिवसांमध्ये भारतात जवळपास १०० कोटी रूपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे.