AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Girija Oak : इंडस्ट्रीत येण्यापूर्वी बाबांनी समोर बसवलं अन्..; गिरीजा ओकने काय सांगितलं?

अभिनेत्री गिरीजा ओक गोडबोले मराठी आणि हिंदी मनोरंजनसृष्टीत लीलया वावरते. एका मुलाखतीनंतर ती रातोरात ‘नॅशनल क्रश’ बनली. तिचा अभिनय प्रवास अपघाताने सुरू झाला, जिथे एका जाहिरातीतून तिला संधी मिळाली. वडील गिरीश ओक यांनी तिला महत्त्वाचा सल्ला दिला: 'जे पटत नाही, त्याला ठामपणे नकार द्यायला शिक.' हा सल्ला तिच्या व्यावसायिक जीवनासाठी मार्गदर्शक ठरला.

Girija Oak : इंडस्ट्रीत येण्यापूर्वी बाबांनी समोर बसवलं अन्..; गिरीजा ओकने काय सांगितलं?
अभिनेत्री गिरीजा ओक
| Updated on: Jun 02, 2026 | 10:00 AM
Share

मराठी मालिका, चित्रपट, नाटकं, जाहिराती यांमध्ये अभिनेत्री गिरीजा ओक गोडबोले जेवढी लीलया वावरते, हिंदीतही तिचा वावर तेवढा सहज, सोपा आणि सुखद असतो. ओटीटीवरंचही तिचं काम लोकांना बरंच आवडलं असून काही महिन्यांपूर्वी एका मुलाखतीतील तिच्या अपीअरन्सनंतर गिरीजा डायरेक्ट ‘नॅशनल क्रश’ बनली, रातोरात प्रसिद्ध झाली. सोशल मीडियावर सर्वत्र तिचे निळ्या साडीतले फोटो, तिचे व्हिडीओ व्हायरल झाले. प्रसिद्धीच्या लाटेचा हाँ अनुभव गिरीजासाठी अतिशय वेगळा पण सुखावणार होता. मात्र त्यात ती वाहूनन जाता पाय जमिनीवर ठामपणे रोवून उभी राहिली. अशा या गुणी अभिनेत्रीने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवण्यापूर्वी काय घडलं, तिच्या वडिलांनी, प्रसिद्ध अभिनेते, डॉ. गिरीश ओक यांनी तिला काय सल्ला दिला ते सांगितलं. नुकत्याच एका कार्यक्रमात सहभागी झालेली गिरीजा ओक खुलेपणाने बोलली.

अपघाताने या क्षेत्रात आले आणि..

मी या क्षेत्रात आले, जाहिरातीत काम करू लागले ते अगदी अपघाताने झालं. मी, माझ्या आईसोबत एका नव्या जाहीरात प्रोडक्शनच्या ओपनिंगसाठी गेलो होतो. ती कंपनी ज्यांची होती, ते माझ्या आईच्या ओळखीचे होते. मी आईसोबत तिथे गेले असताना, एका कास्टिंग डिरेक्टरने मला पाहिलं आणि तुमची मुलगी एका जाहिरातीसाठी ऑडिशन देईल का ? असं माझ्या आईला विचारलं. होकार मिळाल्यावर तिथेच माझी स्क्रीनटेस्ट घेतली आणि मी त्या जाहिरातीसाठी सिलेक्टे झाले. अगदी अपघाताने आणि अशी सहज मी या क्षेत्रात आले. मग एकातून दुसरी, असं करत वेगवेगळ्या, बऱ्याच जाहिराती मला मिळाल्या, अशी आठवण गिरीजा ओक हिने एनडीटीव्ही मराठीच्या मंच महाराष्ट्राच्या रणरागिणींचा गौरव या कार्यक्रमात सांगितली.

बाबांनी दिला महत्वाचा सल्ला

खरं सांगायचं तर माझे वडील, गिरीश ओक यांना या जाहिरातीबद्दल काहीच माहीत नव्हतं. नंतर माझ्या आईने त्यांना याबद्दल सांगितलं. पुढे मला एका मराठी चित्रपटासाठी , ऑडीशनबद्दल विचारणा करण्यासाठी एक फोन आला. माझी ऑडिशन वगैरे झाली आणि मी सिलेक्ट झाले. चित्रपटाचं शूटिंग सुरू होणार होतं, त्याच्या आदल्या दिवशी माझ्या बाबांनी मला समोर बसवलं आणि ते मला म्हणाले, ‘ जर तुला काही पटलं नाही किंवा आवडलं नाही, तर शांत राहू नको, ठामपणे नकार द्यायला, नाही म्हणायला शीक’ असा सल्ला त्यांनी मला दिला.

पुढे ते म्हणाले, ” हे वय असं आहे की या वयात सगळंच भारावून टाकणारं असतं. आपल्या आसपास जी लोकं असतात ती वयाने, अनुभवाने मोठी असतात, त्यामुळे (आपल्याकडून) पटकन होकार दिला जातो. मात्र नंतर आपल्याला कळतं की (एखादी गोष्ट) आपल्याला हे करायला आवजत नाहीये, म्हणूनच नाही म्हणायला शीक. कोणाचंही मन दुखवू नको पण ठामपणे नकार देता आला पाहिजे ” असा मोलाचा सल्ला वडिलांनी दिल्याचं गिरीजाने या कार्यक्रमात नमूद केलं.

Follow Us
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता