‘हे’ गाणे ऐकून लोक आत्महत्या करायचे; जगातील सर्वात दुर्दैवी गाणं;62 वर्षांनंतर बंदी हटवली, चुकूनही ऐकू नका

चित्रपटातील गाणी म्हणजे चित्रपटांचा प्राण असतात. काही गाणी लोकांच्या मनावर खोलवर परिणाम करणारी असतात. पण एक गाणे असेही आहे की ते ऐकून कित्येकांनी आत्महत्या केली आहे. या गाण्याला 62 वर्षांपूर्वी बॅन करण्यात आलं होतं. पण आता या गाण्यावरील बंदी उठवण्यात आली आहे. 

हे गाणे ऐकून लोक आत्महत्या करायचे; जगातील सर्वात दुर्दैवी गाणं;62 वर्षांनंतर बंदी हटवली, चुकूनही ऐकू नका
Gloomy Sunday, The World Saddest Song
Image Credit source: Meta AI
| Updated on: Apr 19, 2025 | 6:08 PM

चित्रपट कोणात्याही भाषेतील असो त्यातील गाणी ही त्या चित्रपटाचा महत्त्वाचा भाग असतात. कारण गाणी ही कोणत्याही चित्रपटाचा प्राण असतात. अनेक चित्रपट केवळ त्यांच्या संगीत आणि गाण्यांच्या जोरावर हिट झाले आहेत. एवंढचं नाही तर आनंदात आणि दुःखातही लोकं चित्रपटातील गाणी ऐकून आपला मूड चांगला करतात. मग ती सकारात्मक गाणी असो, रोमँटीक गाणी असो किंवा ब्रेकअपची गाणी. प्रत्येक प्रकारातील गाणी पसंतीस उतरणारीच असतात.

एक गाणं असं आहे ज्याने अनेकांना दु:खच दिलं

ही गाणी नवी ऊर्जा देतात. दुःखी, रोमँटिक, आकर्षक आणि देशभक्तीपर गाणी लोकांना वेगवेगळ्या ऊर्जा अनुभवायला लावतात. काही गाणी अशी असतात जी लोकांना एखाद्याची आठवण करून देतात आणि त्यांच्या जखमा भरून काढतात. तर, काही गाणी अशी असतात जी वेदना कमी करतात. प्रत्येकाची गाण्यांबाबत आवड ही वेगळी असते. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, एक गाणं असं आहे ज्याने अनेकांना दु:खच दिलं आहे. या गाण्याला जगातील सर्वात दुर्दैवी गाणं असल्याचं म्हटलं आहे. या गाण्याने चक्क 100 हून अधिक लोकांचे प्राण घेतलेत.

हे गाणे ऐकून लोक आत्महत्या करायचे

हे गाणे असे आहे की ते ऐकल्यानंतर लोक आत्महत्या करायचे. हाऊस स्टफ वर्क वेबसाइटनुसार, ‘ग्लूमी संडे’ हे गाणे जगातील सर्वात दुर्दैवी गाणे आहे. हे गाणे रेज्सो सेरेस आणि लैजलो यांनी लिहिले आहे. 1933 मध्ये लिहिलेले हे गाणे 1935 मध्ये रिलीज झालं आणि त्याच वर्षी एका माणसाने ते ऐकल्यानंतर आत्महत्या केली. या व्यक्तीने त्याच्या सुसाईड नोटमध्ये या गाण्याचा उल्लेख केला होता. एवढंच नाही तर असे म्हटले जाते की या गाण्याच्या संगीतकाराच्या प्रेयसीनेही विष प्राशन करून आत्महत्या केली होती. 1968 मध्ये, या गाण्याचे लेखक रेज्सो यांनी देखील आत्महत्या केली. गाणे ऐकल्यानंतर दोन जणांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली आणि तर एका महिलेने पाण्यात उडी मारून आत्महत्या केली. या सगळ्या घटनांनंतर, या गाण्यावर अखेर बंदी घालण्यात आली.

हे एक ‘हंगेरियन’ गाणे 

जेव्हा या गाण्याचे विश्लेषण केले गेले तेव्हा असे आढळून आले की ते एक ‘हंगेरियन’ गाणे आहे. ज्या वेळी हे गाणे रिलीज झाले तेव्हा हंगेरीतील बहुतेक लोक तणावाने ग्रस्त होते. लोक आर्थिक संकटाचा सामना करत होते आणि त्यांना त्यांच्या कंपन्यांमधून काढून टाकले जात होते. अशा परिस्थितीत, या गाण्याचे बोल आणि चित्रीकरण त्याच्या आयुष्याशी जुळू लागले आणि यामुळे त्या लोकांना आणखी दुःख झाले. हे गाणे मानवतेबद्दल, जीवनातील कठीण परिस्थिती, त्यात गुंतलेल्या दैनंदिन दुःखांबद्दल आणि मृत्यूबद्दल आहे. त्यामुळे या गाण्याचा एवढा परिणाम झाला की हे गाणे ऐकून त्यावेळी लोकांनी आत्महत्या केल्या.