वाढदिवसाच्या पार्टीत गोविंदाचा पत्नीसोबत डान्स, पाहा व्हिडीओ

गोविंदाने मोठ्या उत्साहात त्याचा 57 वा वाढदिवस साजरा केला (Govinda dance with his wife on his birthday party).

वाढदिवसाच्या पार्टीत गोविंदाचा पत्नीसोबत डान्स, पाहा व्हिडीओ
| Updated on: Dec 22, 2020 | 12:09 AM

मुंबई : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता गोविंदाचा रविवारी (20 डिसेंबर) 57 वा वाढदिवस होता. गोविंदाने मोठ्या उत्साहात आपला वाढदिवस साजरा केला. गोविंदाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रविवारी पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. गोविंदाचे फॅन्स या व्हिडीओ आणि फोटोंना लाईक आणि शेअर करत आहेत (Govinda dance with his wife on his birthday party).

सोशल मीडयावर ‘व्हायरल भयानी’ने गोविंदाच्या वाढदिवसाच्या पार्टीतील व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओत गोविंदा आपल्या पत्नीसोबत हिरो नंबर 1, कुली नंबर 1 या चित्रपटांच्या गाण्यांवर डान्स करताना दिसत आहे (Govinda dance with his wife on his birthday party).

गोविंदासोबत अभिनेता शक्ती कपूर देखील डान्स करताना दिसत आहे. गोविंदाची पत्नी सुनीता अहुजा देखील गोविंदासोबत थिरकताना दिसत आहे. नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य देखील गोविंदासोबत डान्स करताना दिसत आहे. विशेष म्हणजे या पार्टीला कॉमेडीयन कपिल शर्माने देखील हजेरी लावली होती.

गोविंदाने 1986 साली इल्जाम या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पन केलं. 1990 च्या दशकात त्याची अनेक चित्रपट सुपरहीट ठरली. गोविंदाचे राजा बाबू, कुली नंबर 1, हीरो नंबर 1, दुल्हे राजा, बडे मियाँ छोटे मियाँ, हसीमा मान जाएगी, स्वर्ग हे चित्रपट प्रचंड गाजले होते.

हेही वाचा : ‘हे’ आहेत बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणारे टॉप 5 अभिनेते, जाणून घ्या कोणाचं मानधन किती