गोविंदाचा सलमान खानवर आजवरचा सर्वात मोठा आरोप, ‘त्या’ गोष्टीची केली पोलखोल

गोविंदाने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये सलमान खानवर मोठा आरोप केला आहे. आता हा आरोप काय आहे चला जाणून घेऊया...

गोविंदाचा सलमान खानवर आजवरचा सर्वात मोठा आरोप, त्या गोष्टीची केली पोलखोल
Salman khan and Govinda
Image Credit source: Tv9 Bharatvarsh
| Updated on: Mar 14, 2025 | 12:06 PM

आपल्या अनोख्या डान्स स्टाइलने सर्वांची मने जिंकणारा बॉलिवू़डमधील प्रसिद्ध अभिनेता म्हणून गोविंदा ओळखला जातो. गोविंदाने अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केले आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये गोविंदाने सांगितले की सलमानने विनंती केल्यामुळे ‘जुडवा’ हा सिनेमा सोडला. गोविंदाने सलमानवर नेमके काय आरोप केले चला जाणून घेऊया…

गोविंदाने नुकाताच बॉलिवूड हंगामाला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने सांगितले की, सलमान खानच्या विनंतीवरून गोविंदाने डेव्हिड धवन दिग्दर्शित जुडवा हा चित्रपट सोडला होता. सुरुवातीला करिश्मा आणि गोविंदा या चित्रपटात दिसणार होते. गोविंदाने चित्रपटाचा काही भाग शूटही केला होता. पण सलमानचा फोन आल्यामुळे त्याने स्वतःला चित्रपटापासून दूर केले. स्वत: गोविंदाने हा खुलासा केला आहे.

वाचा: सत्या बोल की रं माझ्याशी; अक्षय खन्नाबाबतच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर संतोष जुवेकरवर मीम्सचा वर्षाव

सलमानने केली सिनेमाची मागणी

१९९७ साली प्रदर्शित झालेला ‘जुडवा’ सिनेमा हा सर्वात पहिले गोविंदाला ऑफर करण्यात होता. याविषयी बोलताना गोविंदा म्हणाला की, ‘त्या वेळी मी करिअरच्या यशाच्या शिखरावर होतो. तेव्हा सिनेमा बनारसी बाबूचे चित्रीकरण सुरु होते. त्याचवेळी मी जुडवा सिनेमावर देखील काम करत होते. या चित्रपटाचे शुटिंग सुरु असताना मला रात्री २-३ वाजता सलमान खानचा फोन आला होता आणि त्याने मला विचारले की, चीची भईया तुम्ही अजून किती हिट सिनेमे देणार?’

सलमानने दिली होती धमकी

‘हे ऐकून मी विचारले – का काय झाले? मग तो म्हणाला- तू सध्या ज्या जुडवा चित्रपटाचे शूटिंग करत आहेस त्या प्रोजेक्टपासून दूर रहा. मला तो सिनेमा दे. ज्या चित्रपटाचे पहिल्यापासून शुटिंग मी करत होतो तो सिनेमा मी सलमान खानसाठी सोडून दिला. त्यामुळे सलमानला हा सिनेमा मिळाला,’ असे गोविंदा पुढे म्हणाला.

सलमान आणि गोविंदाने 2007 मध्ये आलेल्या सलाम-ए-इश्क आणि पार्टनर या दोन चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. पार्टनर चित्रपटानंतर दोघेही कधीच एकत्र चित्रपटात दिसले नाहीत. पार्टनर चित्रपटात एकत्र काम केल्यानंतर सलमानने एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘गोविंदासोबत पार्टनर चित्रपटात काम करताना खूप मजा आली. जरी मला त्यांच्यासोबत काम करायला भीती वाटली असली तरीही. एक व्यक्ती एका चित्रपटात किती कॉमेडी करू शकतो याची कल्पना करा. याच कारणामुळे मला गोविंदासोबत स्क्रीन शेअर करायला भीती वाटते.’