AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गोविंदाने नाकारलेल्या चित्रपटाने अनिल कपूरला बनवलं सुपरस्टार, 50 आठवडे थिएटरमध्ये होता सुरु

ज्या चित्रपटाला गोविंदाने करण्यास दिला होता नकार, त्याच चित्रपटाने अनिल कूपरला बनवलं सुपरस्टार. थेट 50 आठवडे थिएटरमध्ये सुरु होता चित्रपट.

गोविंदाने नाकारलेल्या चित्रपटाने अनिल कपूरला बनवलं सुपरस्टार, 50 आठवडे थिएटरमध्ये होता सुरु
Image Credit source: Social media
| Updated on: Jul 28, 2026 | 3:59 PM
Share

बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट प्रदर्शित होतात, मात्र काही चित्रपट असे असतात जे दशकानुदशके प्रेक्षकांच्या मनात घर करून राहतात. 1988 मध्ये प्रदर्शित झालेला ‘तेजाब’ हा असाच एक चित्रपट आहे. अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अभूतपूर्व यश मिळवले. प्रदर्शित झाल्यानंतर तब्बल 50 आठवडे हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये चालला आणि त्या वर्षातील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या चित्रपटांपैकी एक ठरला.

‘तेजाब’मुळे अनिल कपूरच्या ‘अँग्री यंग मॅन’ भूमिकेला अधिक बळ मिळाले, तर माधुरी दीक्षितला या चित्रपटाने घराघरात लोकप्रियता मिळवून दिली. चित्रपटातील ‘एक दो तीन’ हे गाणे प्रचंड गाजले आणि आजही विविध कार्यक्रम, स्टेज शो आणि समारंभांमध्ये ते आवर्जून वाजवले जाते. या गाण्यामुळे माधुरी दीक्षितच्या कारकिर्दीला मोठी चालना मिळाली.

चंकी पांडेच्या भूमिकेसाठी पहिली पसंती होती गोविंदा

चित्रपटातील ‘बब्बन’ ही महत्त्वाची भूमिका अभिनेता चंकी पांडे यांनी साकारली होती. मात्र, अनेकांना माहीत नसलेली बाब म्हणजे ही भूमिका सुरुवातीला अभिनेता गोविंदाला ऑफर करण्यात आली होती. विविध बातम्यानुसार तारखांच्या अडचणीमुळे गोविंदा हा चित्रपट करू शकले नाही. त्यानंतर ही भूमिका चंकी पांडे यांच्याकडे आली आणि त्यांनी आपल्या दमदार अभिनयाने ती संस्मरणीय बनवली. आजही ‘तेजाब’ची चर्चा झाली की चंकी पांडे यांचा ‘बब्बन’ हा अभिनय विशेष आठवला जातो.

दिग्दर्शक एन. चंद्रा यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटात अनिल कपूर, माधुरी दीक्षित, चंकी पांडे, अनुपम खेर, किरण कुमार, मंदाकिनी, अरुणा इराणी आणि अनु कपूर यांसारख्या दिग्गज कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. प्रेम, सूड, भावना, अॅक्शन आणि संस्मरणीय संगीत यांचा उत्कृष्ट संगम या चित्रपटात पाहायला मिळाला.

आजही कायम आहे ‘तेजाब’ची लोकप्रियता

प्रदर्शित होऊन जवळपास चार दशके उलटून गेली असली तरी ‘तेजाब’ची लोकप्रियता आजही कायम आहे. दूरदर्शनवर हा चित्रपट प्रदर्शित झाला की प्रेक्षक आवर्जून पाहतात. त्यातील गाणी आणि संवाद आजही तितकेच लोकप्रिय आहेत. याच कारणामुळे ‘तेजाब’चा समावेश हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक यशस्वी आणि संस्मरणीय चित्रपटांच्या यादीत केला जातो.

Follow Us
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून टीका
तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना आवाहन
Raj Thackeray : तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना मोठं आवाहन
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदी...
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदींची पोस्ट चर्चेत!
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी...
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी व्यक्त केला आनंद, म्हणाले…
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं काय घडलं?
विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
Maharashtra MLC Election Result 2026 : विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत...
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत निवडणुकांवर उपस्थित केले सवाल
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा...
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी!
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश,
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश, 17 नोव्हेंबरला प्रत्यक्ष हजर राहावे लागणार!
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच...
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच... सुप्रिया सुळेंचं भावनिक विधान