Govinda | गोविंदाच्या पत्नीला उज्जैनच्या महाकाल मंदिरात केलेली एक चूक पडली महागात

| Updated on: May 18, 2023 | 12:02 PM

मंदिर समितीच्या कोणत्याच सदस्याने त्यांना रोखलं का नाही, असाही सवाल नेटकरी करत आहेत. व्हायरल फोटोमध्ये सुनिता अहुजा या पंडितांसोबत दिसत आहेत आणि त्यांच्या खांद्यावर एक बॅग अडकवलेली आहे.

Govinda | गोविंदाच्या पत्नीला उज्जैनच्या महाकाल मंदिरात केलेली एक चूक पडली महागात
Govinda wife Sunita Ahuja
Image Credit source: Instagram
Follow us on

उज्जैन : अभिनेता गोविंदाची पत्नी सुनिता अहुजा यांना उज्जैनच्या महाकाल मंदिरात केलेली एक चूक चांगलीच महागात पडली आहे. सुनिता नुकत्याच महाकाल मंदिराचं दर्शन घेण्यासाठी उज्जैनला पोहोचल्या होत्या. मात्र यावेळी मंदिराच्या गर्भगृहात जेव्हा त्यांनी प्रवेश केला, तेव्हा त्यांच्या हातात एक बॅग पहायला मिळाली. यावरूनच मोठा वाद निर्माण झाला आहे. मंदिराच्या गर्भगृहातील सुनिता यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यावरून नेटकरी त्यांच्यावर टीका करत आहेत.

उज्जैनच्या महाकाल मंदिरात दर्शनाला येणाऱ्या भाविकांसाठी एक मुख्य नियम आहे. कोणताही भक्त गर्भगृहाच्या आता बॅग किंवा पर्स घेऊन प्रवेश करू शकत नाही. मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोंमध्ये सुनिता यांच्या हातात बॅग स्पष्ट पहायला मिळतेय. त्यांनी स्वत: दर्शनानंतर काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

हे सुद्धा वाचा

गोविंदाच्या पत्नीला हातात बॅग घेऊन मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश कोणी दिला, असा प्रश्न संतापलेले नेटकरी उपस्थित करत आहेत. मंदिर समितीच्या कोणत्याच सदस्याने त्यांना रोखलं का नाही, असाही सवाल नेटकरी करत आहेत. व्हायरल फोटोमध्ये सुनिता अहुजा या पंडितांसोबत दिसत आहेत आणि त्यांच्या खांद्यावर एक बॅग अडकवलेली आहे. या घटनेनंतर मंदिराच्या सुरक्षेवरूनही प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण अशा पद्धतीने कोणीही बॅग घेऊन मंदिराच्या आत प्रवेश करू शकतो.

याप्रकरणी महाकाल मंदिराचे व्यवस्थापक संदिप सोनी यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. “मंदिराच्या आत बॅग कसे घेऊन गेले, याप्रकरणी पुढील कारवाई सीसीटीव्ही फुटेज तपासून केली जाईल. मंदिराच्या बाहेर सुरक्षेची एक टीम तैनात होती. मंदिराच्या आत कोणीही पर्स किंवा बॅग घेऊन येऊ नये म्हणून ती टीम तिथे असते. ज्यांनी कोणी ही चूक केली, त्यांच्याविरोधात कठोर कारवाई होईल”, असं ते म्हणाले.