मराठमोळ्या अभिनेत्रींसोबत गोविंदाचे लिंकअप, 10 अफेअर झाल्यानंतर देखील…, कोणी केला मोठा खुलासा?

Govinda Personal Life: गोविंदाचे मराठमोळ्या अभिनेत्रींसोबत लिंकअप, आणि घटस्फोटाबद्दल मोठी माहिती समोर, 'गोविंदाचे 10 अफेअर झाल्यानंतर देखील..', कोणी केला मोठा खुलासा? सर्वत्र गोविंदाच्या खासगी आयुष्याच्या चर्चा...

मराठमोळ्या अभिनेत्रींसोबत गोविंदाचे लिंकअप, 10 अफेअर झाल्यानंतर देखील..., कोणी केला मोठा खुलासा?
फाईल फोटो
| Updated on: Jun 20, 2025 | 11:39 AM

Govinda Personal Life: गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता गोविंदा त्याच्या प्रोफेशनल नाही तर, खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. लग्नाच्या 37 वर्षांनंतर गोविंदा याच्या घटस्फोटाच्या चर्चांनी काही दिवसांपासून जोर धरला आहे. दरम्यान नुकताच झालेल्या एका मुलाखतीत गोविंदाचे मित्र पहलाज निलहानी यांनी अभिनेत्याच्या घटस्फोटाबद्दल आणि मराठमोळ्या अभिनेत्रींच्या लिंकअपबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. सांगायचं झालं तर, पहलाज निलहानी आणि गोविंदा यांची फार जुनी मैत्री आहे.

गोविंदाच्या खासगी आयुष्यावर पहलाज निलहानी म्हणाले, ‘गोविंदाने 10 अफेअर केले तरी सुनीता हिच्यासोबत घटस्फोट होणार नाही.’ गोविंदा आणि सुनीता एकत्र राहत नाही.. असं देखील निलहानी म्हणाले आहेत. मुलाखतीत निलहानी यांनी अनेक मुद्द्यांवर खुलासा केला.

गोविंदा याच्या मराठमोळ्या अभिनेत्रींसोबत अफेअरबद्दल निलहानी म्हणाले, ‘सुनीता आणि गोविंदा यांच्या अमर प्रेमामध्ये कोणीही येणार आहे. सुनीता जे मनात येईल ते बोलते पण गोविंदा कधीच भरकटत नाही. गोविंदाचे 10 अफेअर झाले तरी त्यांच्या नात्याला तडा जाणार नाही… महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोघे वेगळे राहतात.’

पुढे पहलाज निलहानी म्हणाले, ‘गोविंदा कायम दुसऱ्या बंगल्यावर बैठका ठेवतो कायम त्याला झोपायला उशीर होतो. नाहीतर ते कायम एकत्र असते. सध्या गोविंदा याच्याकडे एकही सिनेमा नाही. पण तो शो करतो. त्याचा व्यवसाय देखील संभाळतो. सध्या गोविंदाच्या संपर्कात नाही. पण त्याच्या पायाला गोळी लागली होती, तेव्हा भेटायला गेलेलो…’ असं देखील पहलाज निलहानी म्हणाले.

अभिनेत्याची पत्नी असल्याचं दुःख

एका मुलाखतीत सुनीताने मोठं वक्तव्य केलं होतं. ‘एखाद्या अभिनेत्याची पत्नी असण्याचा अर्थ असा आहे की तुमचं हृदय दगडाचं असलं पाहिजं. तुम्ही पाहता, अभिनेता बहुतेकदा पत्नीपेक्षा त्याच्या अभिनेत्रींसोबत जास्त वेळ घालवतो.” सुनीता हिच्या मते, नायकाचा बहुतेक वेळ इतर अभिनेत्रींसोबत आणि इतर लोकांसोबत जास्त जातो. याबाबत तिने खंतही व्यक्त केली आहे. गोविंदाचा हवा तेवढा सहवास तिला मिळाला नसल्याची खंत तिने व्यक्त केली होती.

गोविंदा आणि सुनीताने 1987 साली लग्न केले होते. दोघांनीही अगदी कमी वयात लग्न केले होते. त्यावेळी सुनीला केवळ 18 वर्षांची होती. सुनीता आणि गोविंदाला दोन मुले आहे. मुलीचे नाव टीना आहे तर मुलाचे नाव यशवर्धन आहे. सुनीता कायम गोविंदा याच्यासोबत असलेल्या नात्याबद्दल अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असते.