मी जे सहन केलं, ते दुसऱ्या कोणत्याच मुलीने…, असं का म्हणालेली करिश्मा कपूर?
Karisma Kapoor Personal Life: 'मी जे सहन केले, ते दुसऱ्या कोणत्याच मुलीने...', संजय कपूर याच्यासोबत झालेल्या घटस्फोटानंतर करिश्मा कपूरने घेतलेला मोठा निर्णय..., सध्या सर्वत्र करिश्मा कपूरच्या खासगी आयुष्याची चर्चा...

Karisma Kapoor Personal Life: 90 च्या दशकात अभिनेत्री करिश्मा कपूर हिने एकापेक्षा एक सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. फक्त चाहतेच नाही तर, अनेक सेलिब्रिटी देखील करिश्मा कपूर हिच्यावर फिदा होते. बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करत असताना करिश्माचं नाव अनेक सेलिब्रिटींसोबत जोडण्यात आलं. पण नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. अखेर 2003 मध्ये करिश्मा कपूर हिने उद्योजक संजय कपूर याच्यासोबत लग्न केलं. ज्याचं नुकताच निधन झालं आहे.
लग्नानंतर करिश्माने हिने एक मुलगी आणि एका मुलाला जन्म दिला. पण लग्नाच्या काही वर्षांनंतर दोघांमध्ये मतभेद होण्यास सुरुवात झाली. अखेर करिश्मा आणि संजय यांनी 2016 मध्ये घटस्फोटाची अधिकृत घोषणा केली. तेव्हा दोघांनी देखील एकमेकांवर गंभीर आरोप केले होते.
संजय कपूरने करिश्मावर केलेले आरोप…
संजय कपूर याने करिश्मावर अनेक गंभीर आरोप केले होतं. अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर स्वतःला सावरण्यासाठी लग्न केलं. फक्त पैशांसाठी लग्न केलं.. असे आरोप संजय कपूर याने केले होते. सांगायचं झालं तर, 2002 मध्ये करिश्मा आणि अभिषेक यांचा साखरपुडा झालेला. पण नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. 2003 मध्ये करिश्मा आणि अभिषेक याचं ब्रेकअप झालं. त्यानंतर 2003 मध्येच करिश्माने संजय याच्यासोबत लग्न केलं.
अभिषेक सोबत लग्न मोडल्यानंतर एका मुलाखतीत करिश्मा म्हणाली होती, ‘माझी बोलण्याची आता वेळ आलेली आहे. मी सर्वांची आभारी आहे. यंदाच्या वर्षाची सुरुवात माझ्यासाठी वाईट होती. मी जे काही सहन केलं आहे, ते दुसऱ्या कोणत्याच मुलीच्या नशिबी नको. मला माझ्या दुःखाचा सामना स्वतःच करावा लागला. मला वाटलं वेळेनुसार सर्वकाही ठिक होईल…’
‘मी खूप काही सहन केलं आहे. माझ्यासोबत जे काही झालं आहे, त्यासोबत मी आता तडजोड केली आहे. फक्त एवढंच बोलेल की जे नशिबात लिहिलेलं आहे ते होणारच… पण मी तेव्हा सर्वकाही सहन करण्यासाठी भावनात्मकरित्या तयार नव्हती… त्या कठीण काळात माझ्यासोबत कोणीच नव्हतं..’
पुढे करिश्मा म्हणाली, ‘कठीण काळात माझे आई – वडील, बहीण, आजी कुटुंबिय जवळचे मित्र माझ्यासोबत नसते तर मी कधीच स्वतःला सावरु शकली नसती… दुःखावर मात करु शकली नसते…’ असं देखील करिश्मा म्हणाली.