Grammy Awards 2022: भारतीय वंशाच्या फाल्गुनी शाह, रिकी केज यांनी पटकावला प्रतिष्ठित ‘ग्रॅमी’ पुरस्कार

| Updated on: Apr 04, 2022 | 1:12 PM

Grammy Awards 2022: 'ग्रॅमी' हा संगीत विश्वातील अत्यंत प्रतिष्ठित पुरस्कार मानला जातो. लास वेगासमधील एमजीएम ग्रँड मार्की बॉलरुमध्ये नुकताच हा पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी भारतीय वंशाच्या दोन कलाकारांनी ग्रॅमी पुरस्कारावर आपलं नाव कोरलं.

Grammy Awards 2022: भारतीय वंशाच्या फाल्गुनी शाह, रिकी केज यांनी पटकावला प्रतिष्ठित ग्रॅमी पुरस्कार
Indian American Singer Falguni Shah, Musician Ricky Kej
Image Credit source: Twitter
Follow us on

Grammy Awards 2022: ‘ग्रॅमी’ हा संगीत विश्वातील अत्यंत प्रतिष्ठित पुरस्कार मानला जातो. लास वेगासमधील एमजीएम ग्रँड मार्की बॉलरुमध्ये नुकताच हा पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी भारतीय वंशाच्या दोन कलाकारांनी ग्रॅमी पुरस्कारावर आपलं नाव कोरलं. संगीतकार रिकी केज आणि भारतीय अमेरिकन गायिका फाल्गुनी शाह (Falguni Shah) यांना ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. रिकी केज (Ricky Kej) यांचा हा दुसरा ग्रॅमी पुरस्कार आहे. 64व्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात त्यांना ‘बेस्ट न्यू एज अल्बम’ या विभागात पुरस्कार मिळाला आहे. ‘डिवाइन टाइड्स’साठी त्यांनी स्टीवर्ट कोपलँडसह हा पुरस्कार पटकावला आहे. या अत्यंत प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्यात अनेक दिग्गज कलाकारांनी परफॉर्म केलं. दक्षिण कोरियातील प्रसिद्ध के पॉप बँड ‘बीटीएस’ने (BTS) सादर केलेलं परफॉर्मन्स या सोहळ्याचं विशेष आकर्षण ठरलं.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर रिकी यांनी ट्विट करत जगभरातील चाहत्यांचे आभार मानले. ‘डिवाइन टाइड्स या आमच्या अल्बमसाठी आम्ही ग्रॅमी हा पुरस्कार जिंकला आहे. हा माझा दुसरा ग्रॅमी पुरस्कार आहे तर स्टीवर्टचा सहावा. तुम्हा सर्वांचे खूप आभार’, असं ट्विट रिकी यांनी केलं. गायिका फाल्गुनी शाहला ‘बेस्ट चिल्ड्रन्स म्युझिक अल्बम’ विभागात पुरस्कार मिळाला. ‘अ कलरफुल वर्ल्ड’ या तिच्या अल्बमसाठी ग्रॅमी पुरस्काराने तिचा सन्मान करण्यात आला. फाल्गुनीनेही ट्विट करत तिच्या भावना व्यक्त केल्या.

रिकी केज यांचं ट्विट-

फाल्गुनी शाह यांची पोस्ट-

‘मी नि:शब्द झालेय. ग्रॅमी प्रीमिअरमध्ये सुरुवातीलाच मला परफॉर्म करण्याची संधी मिळाली. ही माझ्यासाठी अत्यंत सन्मानाची बाब आहे. त्यानंतर अत्यंत प्रतिभावान लोकांसोबत काम करत असताना हा पुरस्कार घरी घेऊन जाणं हीसुद्धा माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. यासाठी मी रेकॉर्डिंग अकादमीचे आभार मानते’, असं तिने लिहिलं. 64 व्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात जगभरातील दिग्गज संगीतकार, गायकांनी हजेरी लावली. ए. आर. रेहमान यांनीसुद्धा या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली.

हेही वाचा:

Mika Singh: ..अन् मिका सिंगचा पारा चढला; पत्रकाराला केली शिवीगाळ

VIDEO: बायोपिक पाहून टेनिस क्रिकेटचा बाहशाह प्रवीण तांबेंच्या डोळ्यात आलं पाणी