Rekha: रेखा यांनी ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यासोबत उरकलेलं लग्न! पण नवरा मानण्यास दिलेला स्पष्ट नकार, कारण…
Rekha: रेखा यांनी एका उद्योजकासोबत लग्न केलं होतं, पण दोघांचं लग्न फार काळ टिकलं नाही. असं सांगितलं जातं. पण एका प्रसिद्ध अभिनेत्यासोबत देखील रेखा यांनी गुपचूप लग्न उरकलं होतं. पण अभिनेत्याला नवरा मानण्यास सर्वांसमोर स्पष्ट नकार खुद्द रेखा यांनी दिलेला... जाणून कोणता आहे हा किस्सा...

Rekha Love Life: आज रेखा यांचं आयुष्य प्रचंड ग्लॅमरस आणि रॉयल वाटतं, पण दिसतं तसं नसतं… असं म्हणतात, ते अगदी बरोबर आहे. रेखा अभिनय विश्वात यशाच्या शिखरावर तर पोहोचल्या, पण हा प्रवास त्यांच्यासाठी फार कठीण होता. रेखा यांना वडिलांनी कधीच लेकीचा दर्जा दिला नाही. अशात आर्थिक परिस्थितीमुळे रेखा यांनी अभिनय विश्वात पदार्पण केलं. इच्छा नसताना त्यांनी झगमगत्या विश्वात पाऊल ठेवलं. यामध्ये त्यांनी स्वतःला सिद्ध करत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. पण रेखा यांच्या मनावर कोणी फार काळ राज्य करु शकलं नाही. दिवंगत अभिनेते विनोद मेहरा याच्यासोबत लग्नाच्या चर्चा, महानायक अमिताभ बच्चन याच्यासोबत अफेअर आणि उद्योजक पती मुकेश अग्रवाल यांनी उचलेलं टोकाचं पाऊल… यामुळे रेखा यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले. ज्यामुळे त्या पूर्णपणे कोलमडल्या. पण अशा परिस्थितीत देखील त्यांनी हिंदी सिनेविश्वावर राज्य केलं. आजही रेखा यांची लोकप्रियता कमी झालेली नाही.
सांगायचं झालं तर, 2004 मध्ये झालेल्या सिमी गरेवाल यांच्या मुलाखतीत रेखा यांनी विनोद मेहरा यांच्यासोबत असलेल्या नात्याबद्दल स्पष्ट सांगितलं होतं. लग्नाच्या चर्चांवर रेखा यांनी हैराणी व्यक्त केली. एवढंच नाही तर, रेखा यांनी फारुक अब्दुल्ला यांच्यासोबत देखील लग्न केलं… अशा चर्चांनी देखील जोर धरलेला.. पण रेखा यांनी या चर्चांनी कधीच अधिक महत्त्व दिलं नाही.
रेखा यांच्यासाठी विनोद मेहरा प्रचंड खास होते. पण रेखा यांनी अभिनेत्याला कधीच नवरा म्हणून स्वीकारलं नाही. रेखा यांनी विनोद मेहरा यांनी अत्यंत जवळचा व्यक्ती आणि शुभचिंतक असल्याचं सांगितलं. रेखा यांनी सांगितल्यानुसार, विनोद मेहरा त्यांच्या आयुष्यातील एक असे व्यक्ती होते, जे त्यांच्यासाठी फार खास होते… ‘विनोद मेहरा यांच्यासोबत माझं नातं फार खास होतं..’ असं रेखा म्हणालेल्या, त्यांनी नवरा म्हणून अभिनेत्याचा स्वीकार कधीच केला नाही.
पण विनोद मेहरा यांच्या आई आणि रेखा यांच्या नात्याबद्दल अनेक चर्चा आजही रंगत असतात. यासिर उस्मान लेखीत ‘रेखा : द अनटोल्ड स्टोरी’ पुस्तकात असं लिहिण्यात आलं आहे की, विनोद मेहरा यांच्या आईने कधीच रेखा यांचा स्वीकार सून म्हणून केला नाही. असं देखील सांगितलं जातं की, रेखा जेव्हा विनोद मेहरा यांच्या आईचे आशीर्वाद घेण्यासाठी पुढे आल्या तेव्हा अभिनेत्याच्या आईने त्यांना धक्का दिला… रेखा आणि विनोद मेहरा यांच्यातील संबंधांचे स्वरूप काहीही असले, तरी त्यांच्या लग्नाच्या चर्चा आणि सासरच्या मंडळींचे कथित वर्तन यामुळे त्यांचं वैयक्तिक आयुष्य बराच काळ चर्चेत राहिलं.