Vijay Deverakonda: विजय देवरकोंडाला अभिनय नव्हे तर ‘या’ क्षेत्रात करायचं होतं करिअर

| Updated on: May 09, 2022 | 10:43 AM

विजयने (Vijay Deverakonda) 2011 मध्ये 'नुव्विल्ला' या रोमँटिक कॉमेडी चित्रपटातून पदार्पण केलं. मात्र 'अर्जुन रेड्डी' या चित्रपटामुळे त्याला खूप प्रसिद्धी मिळाली. अभिनयासोबतच विजयने एका लघुपटाचं दिग्दर्शनही केलंय. 'मॅडम मीराना' या लघुपटाचं दिग्दर्शन त्याने अवघ्या पाच तासांत केलं.

Vijay Deverakonda: विजय देवरकोंडाला अभिनय नव्हे तर या क्षेत्रात करायचं होतं करिअर
Vijay Deverakonda
Image Credit source: Instagram
Follow us on

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वांत लोकप्रिय अभिनेता विजय देवरकोंडाने (Vijay Deverakonda) आपल्या दमदार अभिनयकौशल्याच्या जोरावर संपूर्ण देशभरात आपला चाहतावर्ग निर्माण केला. 32 वर्षीय विजयचे सोशल मीडियावर असंख्य फॉलोअर्स आहेत. ‘डिअर कॉम्रेड’, ‘अर्जुन रेड्डी’ (Arjun Reddy) यांसारख्या त्याच्या चित्रपटांनी प्रेक्षकांवर छाप सोडली. लवकरच तो बॉलिवूडमध्येही पदार्पण करणार आहे. विजयला अभिनय क्षेत्राचा वारसा हा त्याच्या वडिलांकडूनच मिळाला आहे. त्याचे वडील देवरकोंडा गोवर्धन राव हे तेलुगू (Telugu) टेलिव्हिजन क्षेत्रात दिग्दर्शक म्हणून काम करत होते. विजयने आतापर्यंत ‘पेन्ली चुपुलू’, ‘अर्जुन रेड्डी’, ‘महानटी’, ‘गीता गोविंदम’, ‘टॅक्सी ड्राइव्हर’, ‘डिअर कॉम्रेड’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. तरुणींच्या गळ्यातील ताईत असलेल्या या विजयबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात..

विजयने 2011 मध्ये ‘नुव्विल्ला’ या रोमँटिक कॉमेडी चित्रपटातून पदार्पण केलं. मात्र ‘अर्जुन रेड्डी’ या चित्रपटामुळे त्याला खूप प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटानंतर त्याला घरातलेही ‘रावडी’ असं म्हणू लागले, असं त्याने एका मुलाखतीत सांगितलं. अभिनयासोबतच विजयने एका लघुपटाचं दिग्दर्शनही केलंय. ‘मॅडम मीराना’ या लघुपटाचं दिग्दर्शन त्याने अवघ्या पाच तासांत केलं. आपल्या अनोख्या फॅशन सेन्ससाठी ओळखल्या जाणाऱ्या विजयने ‘द रावडी क्लब’ हे ऑनलाइन फॅशन ब्रँड सुरू केलं.

हे सुद्धा वाचा

पहा फोटो-

विजयने त्याच्या 30व्या वाढदिवशी चाहत्यांसाठी नऊ ट्रक भरून आईस्क्रीम वाटले होते. हे आईस्क्रीम हैदराबाद, विजयवाडा, तिरुपती, बेंगळुरू, चैन्नई आणि कोची या पाच राज्यांमध्ये वाटण्यात आले होते. त्याच्या आधीच्या वाढदिवशीही त्याने जवळपास चार ते पाच हजार आईस्क्रीमचं वाटप केलं होतं. विजयला गायनक्षेत्रात करिअर करायचं होतं. गायक होण्याचं त्याचं लहानपणापासूनचं स्वप्न होतं. यासाठी त्याने शास्त्रीय संगीत शिकण्यासही सुरुवात केली होती. मात्र काही काळानंतर त्याचा रस क्रिकेटमध्ये अधिकाधिक वाढू लागल्याने त्याने गायन सोडलं.