
भोजपुरी क्वीन मोनालिसा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि या माध्यमातून ती तिच्या चाहत्यांशी जोडलेली असते. ती तिच्या चाहत्यांना तिच्या प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफबद्दल अपडेट देत असते.

नुकतंच मोनालिसाने चाहत्यांना या पवित्र दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

मोनालिसाने तिचे पारंपरिक अवतारातील फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिने पिंक कलरची साडी नेसलेली दिसत असून तिने हटके मेकअप केला आहे.

तिचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. या फोटोंमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.

फोटोंमध्ये मोनालिसा वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे. तिच्या चाहत्यांच्याही हा लूक पसंतीस उतरतो आहे. फोटोंवर चाहते जोरदार कमेंटही करत आहेत.