Har Har Mahadev: ‘हर हर महादेव’ची अपेक्षेपेक्षा दुप्पट कमाई; काही भागांत ‘थँक गॉड’लाही टाकलं मागे

| Updated on: Oct 27, 2022 | 6:12 PM

शरद केळकरची दमदार कामगिरी; 'हर हर महादेव'ची जबरदस्त ओपनिंग

Har Har Mahadev: हर हर महादेवची अपेक्षेपेक्षा दुप्पट कमाई; काही भागांत थँक गॉडलाही टाकलं मागे
Har Har Mahadev
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई- दिवाळी फक्त हिंदी चित्रपटांसाठीच नाही तर मराठी चित्रपटांसाठीही आनंददायी ठरली आहे. मंगळवारी ‘राम सेतू’ आणि ‘थँक गॉड’ या बॉलिवूड चित्रपटांसोबतच ‘हर हर महादेव’ (Har Har Mahadev) हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला. शरद केळकरची (Sharad Kelkar) मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी दमदार कमाई केली. प्रदर्शनाच्या दिवशी जबरदस्त कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांच्या यादीत ‘हर हर महादेव’चा समावेश झाला आहे.

मंगळवारी या चित्रपटाने जवळपास दोन कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. अभिजीत शिरीष देशपांडे दिग्दर्शित हा चित्रपट ऐतिहासिक कथानकावर आधारित आहे. चित्रपटात सुबोध भावेनं छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे तर शरद केळकर यामध्ये बाजीप्रभू देशपांडे यांच्या भूमिकेत आहे.

सुबोध भावे आणि शरद केळकरसोबतच चित्रपटात अमृता खानविलकर, सायली संजीव, निशिगंधा वाड, अशोक शिंदे, मिलिंद शिंदे, हार्दिक जोशी, किशोर कदम, शरद पोंक्षे यांच्याही भूमिका आहेत.

हे सुद्धा वाचा

काही भागांमध्ये ‘हर हर महादेव’ने अजय देवगणच्या ‘थँक गॉड’पेक्षाही चांगली कमाई केली आहे. यावर्षी प्रदर्शित झालेल्या ‘पावनखिंड’ आणि ‘चंद्रमुखी’ या चित्रपटांचीही पहिल्या दिवशी दणक्यात कमाई झाली होती. पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करण्याचा मराठी चित्रपटाचा विक्रम हा अजूनही ‘सैराट’च्या नावावरच आहे.

2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सैराट’ने प्रदर्शनाच्या दिवशी 3.06 कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यानंतर रितेश देशमुखच्या ‘लय भारी’ने तीन कोटी रुपये कमावले होते. चित्रपट व्यापार विश्लेषकांच्या मते ‘हर हर महादेव’ची कमाई ही 40 कोटींपर्यंत पोहोचू शकते.