या भूमिकेसाठी शरदवर चक्क कौतुकाचा वर्षाव होतोय. तो आता चाहत्यांसाठी तो 4 नव्या चित्रपटाची मेजवानी देणार आहे. (Sharad Kelkar will shine in four more films)
1/6

अक्षय कुमारच्या 'लक्ष्मी' या चित्रपटात शरद केळकरनं एक छोटी भूमिका साकारली आहे.
2/6

या भूमिकेसाठी शरदवर चक्क कौतुकाचा वर्षाव होतोय. चाहत्यांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मीम्स तयार करण्यात आले आहेत. सोबतच चाहत्यांसाठी तो 4 नव्या चित्रपटाची मेजवानी देणार आहे.
3/6

भुज द प्राइड ऑफ इंडिया - या चित्रपटात अभिनेता अजय देवगन मुख्य भूमिका साकारणार आहे. अजय देवगनसोबत शरदही या चित्रपटात भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट 1971 च्या भारत- पाकिस्तान युद्धावर आधारित आहे.
4/6

अवैध- या चित्रपटात शरद फुटबॉल प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे.
5/6

जर्सी - शाहिद कपूरच्या आगामी 'जर्सी'मध्ये सुद्धा शरद केळकर झळकणार आहे. या चित्रपटात तो क्रिकेटरच्या भूमिकेत दिसणार आहे.
6/6

अल्यान – शरद लवकरच तमिळ चित्रपटातही झळकणार आहे. त्यामुळे आता त्याच्या चाहत्यांची उत्सुक्ता शिगेला पोहचली आहे. महत्वाचं म्हणजे तो या चित्रपटात मूख्य भूमिकेत असणार आहे.