
Ajaz Khan MMS Video : बिग बॉस फेम अभिनेता एजाज खान सध्या पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. यावेळी चर्चेचं कारण त्याच्या कामगिरीशी संबंधित नसून सोशल मीडिया इन्फ्लुएंसर ‘फिट वर्षा’ने केलेले गंभीर आरोप आणि त्यानंतर समोर आलेला कथित MMS व्हिडिओ हे आहे. या प्रकरणामुळे सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली असून एजाज खान याच्याबाबत विविध प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.
दिल्लीतील सोशल मीडिया इन्फ्लुएंसर फिट वर्षा हिने इंस्टाग्रामवर बिग बॉस 7 मधील स्पर्धक एजाज खान याच्यावर थेट आरोप करत काही कथित चॅट्स शेअर केल्या. या चॅट्स सध्या इंटरनेटवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. या पोस्टसोबत वर्षाने कॅप्शनमध्ये लिहिलं होतं, ‘सगळेच एक्सपोज करत आहेत, म्हणून मीही एका बिग बॉस कंटेस्टंटला एक्सपोज करायचं ठरवलं.’
शेअर केलेल्या चॅट्समध्ये एजाज खान दिल्लीमध्ये असल्याचं सांगताना दिसत आहे. तो वर्षाला, ‘तू दिल्लीची आहेस, मीही दिल्लीमध्ये आहे’, असं म्हणत आपला व्हॉट्सॲप नंबर शेअर करतो. यावर वर्षा विचारते, ‘तू मला नंबर का देतोयस?’ त्यावर एजाज खान उत्तर देतो, ‘बोलण्यासाठी. आपण एकत्र काही करू शकतो.’
या संभाषणाच्या शेवटी वर्षा त्याला थेट ‘गेट लॉस्ट’ असं उत्तर देते. या प्रतिक्रियेवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करत वर्षाच्या भूमिकेचं कौतुक केलं आहे.
कथित MMS व्हिडिओने वाढवला वाद
या चॅट्सनंतर आता सोशल मीडियावर एजाज खानचा एक कथित MMS व्हिडिओ व्हायरल होत असल्याचं सांगितलं जात आहे. या व्हिडिओमध्ये एजाज खान एका महिलेसोबत दिसत असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, हा व्हिडिओ खरा आहे की एआयद्वारे तयार करण्यात आला आहे याची कोणतीही अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.
या संपूर्ण MMS लीक आणि चॅट्स वादावर एजाज खान याच्याकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे या प्रकरणातील सत्य नेमकं काय याबाबत संभ्रम कायम आहे. सोशल मीडियावर काही लोक त्यांच्यावर टीका करत आहेत तर काही जण कोणताही निष्कर्ष काढण्याआधी सत्य समोर येण्याची वाट पाहण्याचं आवाहन करत आहेत.
त्यामुळे सध्या तरी हा संपूर्ण प्रकार आरोप आणि चर्चेपुरताच मर्यादित असून सत्य काय आहे हे स्पष्ट होण्यासाठी एजाज खानची प्रतिक्रिया किंवा अधिकृत तपासाची वाट पाहावी लागणार आहे.