प्रियदर्शनचं नवीन नाटक लवकरच रंगभूमीवर; ‘या’ दिवशी होणार ‘हसता हा सवता’ नाटकाचा शुभारंभ

| Updated on: Jun 15, 2022 | 7:35 AM

या नाटकात प्रियदर्शन जाधव (Priyadarshan Jadhav) मध्यवर्ती भूमिकेत असून त्याच्यासोबत अमोल बावडेकर, अश्विनी जोशी, श्रद्धा पोखरणकर, प्रसाद दाणी हे कलाकार दिसणार आहेत.

प्रियदर्शनचं नवीन नाटक लवकरच रंगभूमीवर; या दिवशी होणार हसता हा सवता नाटकाचा शुभारंभ
Hasta Ha Savta
Image Credit source: Tv9
Follow us on

नवनवीन कलात्मक अनुभूती निर्माण व्हाव्यात व नव्या जाणिवा असलेला प्रेक्षक घडावा या हेतूने नवी नाटकं रंगभूमीवर येऊ घातली आहेत. मनोरंजनासोबत विचार करायला प्रवृत्त करणारा असचं एक वेगळ नाटक रंगभूमीवर येण्यास सज्ज झालं आहे. अभिराम भडकमकर लिखित आणि कुमार सोहोनी दिग्दर्शित ‘हसता हा सवता’ (Hasta Ha Savta) या नव्या विनोदी नाटकाचा शुभारंभ 17 जूनला दुपारी 4 वाजता दीनानाथ नाट्यगृह, विलेपार्ले येथे होणार आहे. मोरया थिएटर्स निर्मित आणि वेदान्त एण्टरटेन्मेंट प्रकाशित या नाटकात प्रियदर्शन जाधव (Priyadarshan Jadhav) मध्यवर्ती भूमिकेत असून त्याच्यासोबत अमोल बावडेकर, अश्विनी जोशी, श्रद्धा पोखरणकर, प्रसाद दाणी हे कलाकार दिसणार आहेत. या नाटकाची निर्मिती भाऊसाहेब भोईर यांनी केली असून सुत्रधार भैरवनाथ शेरखाने आहेत.

या नाटकाची संकल्पना महात्मा फुले यांच्या एका वाक्यावर आधारलेली आहे. एकमेकांवर ‘मालकी हक्क’ गाजवण्यापेJक्षा प्रेम करू असा विचार यात मांडण्यात आला आहे. कौटुंबिक आशय फँटसी पद्धतीने मांडत लेखक अभिराम भडकमकरआणि दिग्दर्शक कुमार सोहोनी ही जोडगोळी ‘हसता हा सवता’ या नाटकातून प्रेक्षकानां काहीतरी वेगळं देणार हे नक्की.

हे सुद्धा वाचा

इन्स्टा पोस्ट-

या नाटकाचे वैशिष्ट्य म्हणजे कुमार सोहोनी यांच्या दिगदर्शनाची 49 वर्षे पूर्ण झाली असून 50व्या वर्षातले हे पहिलेच नाटक आहे. नुकताच सांस्कृतिक विभागाचा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार त्यांना मिळाला आहे. बऱ्याच वर्षानी ते विनोदी नाटकाचे दिग्दर्शन करत आहेत. नाटकाची प्रकाशयोजना ही त्यांचीच आहे. पुरुषोत्तम बेर्डे संगीत देतायेत. नेपथ्य बाबा पार्सेकर यांचे आहे. अभिनेता प्रियदर्शन जाधव याचे 25 वे नाटकं आहे. एकंदरीतच विषयापासून ते सादरीकरणापर्यंत चांगली भट्टी असल्यामुळे ‘हसता हा सवता’ हे नाटक प्रेक्षकांचे दिलखुलास मनोरंजन करेल असा विश्वास नाटकाच्या संपूर्ण टीमने व्यक्त केला आहे.