‘सर, प्रेमाचं काय करायचं’, महिला कला महोत्सवात मकरंद देशपांडेंचं नाटक सादर

महिला कला महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी सादर झालेल्या 'सर, प्रेमाचं काय करायचं' या नाटकांचा प्रयोग हाऊसफुल्ल झाला. सर आणि त्यांच्या तीन विद्यार्थ्यांच्या भवती फिरणार कथानक असलेल्या या नाटकात मकरंद देशपांडे , आकांक्षा गाडे, निनाद लिमये, माधुरी गवळी आणि अजय कांबळे यांची प्रमुख भूमिका आहे.

'सर, प्रेमाचं काय करायचं', महिला कला महोत्सवात मकरंद देशपांडेंचं नाटक सादर
मकरंद देशपांडे- महिला कला महोत्सव
Follow us
| Updated on: Mar 10, 2022 | 8:10 AM

मुंबई : महाराष्ट्र राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत, पु. ल. देशपांडे (Pu La Deshpande) महाराष्ट्र कला अकादमीच्या (Maharashtra Kala Akadami) वतीने दिनांक 8 मार्च ते 12 मार्च या कालावधीत महिला कला महोत्सवाचं ( Mahila kala Mahotsav) आयोजन करण्यात आलं आहे. पाच दिवसीय कलामहोत्सवात विविध सांस्कृतिक कलाविष्कार सादर होणार आहे. पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या मार्फत दरवर्षी 8 मार्चला महिला कला महोत्सवाचं आयोजन केलं जातं. महिलाविषयक प्रबोधन, माहितीपर कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम यांचं या महोत्सवादरम्यान आयोजन करण्यात आलं आहे. यावर्षीही या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून एकूण 24 कार्यक्रम सादर होणार आहेत.कलामहोत्सवाच्या पहिल्याच दिवशी सादर झालेल्या ‘सर, प्रेमाचं काय करायचं’ या नाटकांचा प्रयोग हाऊसफुल्ल झाला. सर आणि त्यांच्या तीन विद्यार्थ्यांच्या भवती फिरणार कथानक असलेल्या या नाटकात मकरंद देशपांडे (Makrand Deshpande), आकांक्षा गाडे (Akanksha Gade), निनाद लिमये (Ninad Limaye), माधुरी गवळी (Madhuri Gavali) आणि अजय कांबळे (Ajay Kambale) यांची प्रमुख भूमिका आहे.

या कला महोत्सवाची सुरुवात मीना नाईक यांच्या पॉक्सो कायद्यावर आधारित ‘अभया’ एकपात्री नाटकाच्या प्रयोगापासून सुरुवात झाली. पोक्सो या बालकांवर होणाऱ्या लैंगिक शोषणावरील कायद्याबाबत जनजागृती करणार हे नाटक असून या प्रयोगाला निवृत्त न्यायमूर्ती मृदुला भाटकर आणि अभिनेता सचिन खेडेकर यांची विशेष उपस्थिती होती. शिल्पी सैनी यांच्या कथ्थक नृत्याचा ‘नृत्यार्धना’ हा नृत्याविष्कार अभयानंतर सादर झाला तर कलांगणात शाहीर मिराताई उमप, संध्या सखी, विमल माळी यांनी ‘जागर महिला लोककलेचा’ या भारुडावर आधारित कार्यक्रमातुन लोक कलेतील स्त्री साहित्याविषयी जनजागृती केली.

पहिला दिवस असला तरी या कला महोत्सवात महिला प्रेक्षकांची संख्या ही उल्लेखनीय होती. तसेच सर प्रेमाचं काय करायचं या नाटकाला प्रेक्षकांनी लावलेली हजेरी ही विशेष उल्लेखनीय होती. नाटकाच्या या महिला दिन विशेष प्रयोगाला प्रेक्षकांनी उभं राहून 5 मिनिट टाळ्या वाजवून कलाकारांना दाद दिली. शासनाच्या 100 टक्के प्रेक्षक उपस्थितीच्या निर्णयाच स्वागत मकरंद देशपांडे यांनी केलेच पण त्याच बरोबर ‘महिला दिन’ निमित्ताने नाटकाचा खास प्रयोग सादर करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी सांस्कृतिक कार्य विभागाचे विशेष आभार मानले.

“महिला दिन निमित्ताने आमच्या नाटकाचा प्रयोग करण्याची संधी दिल्याबद्दल आणि एक अनोखं व्यासपीठ आम्हला दिल्याबद्दल सांस्कृतिक कार्य विभागाचे खरच आभार, महिला कला महोत्सवातून समाजाला ‘स्त्री’ साहित्याकडे ओढ निर्माण होऊ शकते तसेच त्यातून अनेक स्त्रियांच्या मनात कला विभागात आपलं पाऊल ठेवण्यास विश्वास निर्माण होईल ही खात्री आहे. मंगळवारचा प्रयोग आणि तो ही तुडुंब गर्दीत हे अविस्मरणीय आहे. नाटकाला लागणारी दाद देणारा प्रेक्षक नाट्यगृहापर्यंत आणण्यासाठी असे अनेक कला महोत्सव होवो” अशा शब्दात मकरंद देशपांडे यांनी आपले या कला महोत्सवा विषयी मनोगत व्यक्त केले आहे.

संबंधित बातम्या

छोट्या दोस्तांना भेटायला येणार ‘चार यार पक्के’, नवीन बालनाट्य लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार

यूट्यूबर गणेश शिंदेंनी बायकोचं स्वप्न पूर्ण केलं, योगिता शिंदेंना घेऊन गेले ‘या’ विशेष ठिकाणी

“मला 19 वर्षीय सासरा असता पण…”, राहुल महाजनचं विधान चर्चेत

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.