चार मुलांच्या बापाशी लग्न केल्याचा अभिनेत्रीला पश्चाताप, म्हणाली, ‘अनेकांनी टोमणे मारले आणि…’

Bollywood Actress: 27 वर्ष मोठ्या नवऱ्याला घटस्फोट दिल्यानंतर, अभिनेत्रीने चार मुलांच्या बापाशी थाटला दुसरा संसार, पश्चाताप झाल्यानंतर अभिनेत्री म्हणाली, 'अनेकांनी टोमणे मारले आणि...'

चार मुलांच्या बापाशी लग्न केल्याचा अभिनेत्रीला पश्चाताप, म्हणाली, अनेकांनी टोमणे मारले आणि...
फाईल फोटो
| Updated on: Oct 17, 2025 | 2:05 PM

Bollywood Actress Life: बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी घटस्फोटानंतर दुसरा संसार थाटला. पण झगमगत्या विश्वात अशी एक अभिनेत्री आहे जीने 27 वर्ष मोठ्या नवऱ्याला घटस्फोट दिल्यानंतर चार मुलांच्या बापासोबत संसार थाटला. आज अभिनेत्री दुसऱ्या नवऱ्याची पहिल्या पत्नी आणि चार मुलांसोबत आनंदाने जगत आहे. पण लग्नानंतर अभिनेत्रीने मोठ्या संकटांचा सामना केला. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री हेलन आहेत. सांगायचं झालं तर, 700 पेक्षा अधिक सिनेमांमध्ये हेलन यांनी काम केलं आहे.

हेलन यांचं पहिलं लग्न…

1957 मध्ये हेलन यांनी ‘दिल दौलत दुनिया’ सिनेमाचे दिग्दर्शत प्रेम नारायण याच्यासोबत लग्न केलं. प्रेम नारायण हे हेलन यांच्यापेक्षा 27 वर्षांनी मोठे होते. रिपोर्टनुसार, प्रेम नारायण अरोरा यांच्यावर आरोप होते की, ते हेलन यांच्या पैशांवर आनंद घ्यायचा. त्यांनी हेलन यांचं सर्व पैसे देखील स्वतःच्या नावावर केले होते. घराचं भाडं भरण्यासाठी देखील हेलन यांच्याकडे पैसे नव्हते. हेलन पूर्णपणे कंगाल झाल्या होत्या.

अशाच लेखक सलीम खान यांनी हेलन यांची मदत केली. अनेक सिनेमांमध्ये सलीम खान यांनी हेलन यांना काम मिळवून दिलं. तेव्हा दोघांच्या मैत्रीची चर्चा सर्वत्र रंगली होती. सांगायचं झालं तर, पहिल्या पतीला घटस्फोट दिल्यानंतर हेलन यांची आर्थिक परिस्थीती बिकट होती. हेलन यांच्या कठीण काळात सलीम खान यांनी अभिनेत्रीची प्रचंड मदत केली. ज्यामुळे सलीम खान आणि हेलन यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सर्वत्र रंगू लागल्या होत्या.

सलीम खान यांच्यानुसार हेलन यांची बदनामी होण्यापासून वाचवण्यासाठी दुसरं लग्न केलं. पण दुसऱ्या लग्नामुळे पहिली पत्नी सलमा खान यांच्यासोबत असलेल्या नात्याला तडा गेला… नवऱ्याच्या दुसऱ्या लग्नामुळे सलमा खान नाराज झाल्या होत्या. पण वेळेनुसार सर्वकाही ठिक झालं.

दुसऱ्या लग्नाबद्दल काय म्हणालेल्या हेलन…

खान कुटुंबात आल्यानंतर हेलन यांना कठीण परिस्थितिचा सामना करावा लागला. पण मतभेद दूर झाल्यानंतर हेलन यांनी कुटुंबियांनी स्वीकारलं. एका मुलाखतीत सलीम खान म्हणालेले, ‘मुलांना कळलं होतं की, त्यांच्या आई प्रमाणेच हेलन देखील चांगली आहे… आज सलमान याने त्याच्या आईसाठी काही आणलं तर, तो हेलनसाठी देखील घेऊन येतो…’ खान कुटुंब कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतं.