चांगल्या कुटुंबातील मुलगा तुझ्यासोबत…, सुष्मिताला असं काय म्हणालेले न्यायाधीश?
Sushmita Sen: अभिनेत्री सुष्मिता सेन कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते... एका मुलाखतीत अभिनेत्रीने कोर्टात घडलेला किस्सा सांगितला.... अभिनेत्री पूर्वीप्रमाणे मोठ्या पडद्यावर सक्रिय नसली तरी, खासगी आयुष्यामुळे मात्र कायम चर्चेत असते.

अभिनेत्री सुष्मिता सेन हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्रीने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आज अभिनेत्री पूर्वीप्रमाणे मोठ्या पडद्यावर सक्रिय नसली तरी, खासगी आयुष्यामुळे मात्र कायम चर्चेत असते. सुष्मिताचं खासगी आयुष्य, बॉयफ्रेंड, लग्नाआधी झालेली आई… अनेक गोष्टींमुळे अभिनेत्री आजही चर्चेत असते. दरम्यान, एकदा न्यायाधिशाने सुष्मिता हिच्यासाठी मोठं वक्तव्य केलेलं. चांगल्या कुटुंबातील मुलगा सुष्मिता हिच्यासोबत कधीच लग्न करणार नाही.. असं न्यायाधीश अभिनेत्रीच्या वडिलांसमोर म्हणालेले… तर ते असं का म्हणले होते जाणून घेऊ…
एका मुलाखतीत सुष्मिता हिने मोठी मुलगी रेने हिला दत्तक घेताना आलेल्या अडचणींबद्दल सांगितलं होतं. बाळाला जन्म देताना आई नऊ महिने यातना सहन करते. तर सुष्मिताने मुलीला मिळवण्यासाठी कोर्टाच्या अनेक फेऱ्या मारल्या… रेने हिला घरी आणण्यासाठी कोर्टात मोठी लढाई लढावी लागली होती… असं सुष्मिता हिने मुलाखतीत सांगितलं होतं. या लढाईत अभिनेत्रीची साथ तिच्या वडिलांनी दिली होती.
सुष्मिता म्हणाली, ‘मी 21 वर्षांची होती आणि मला माहिती होतं की मला हे करायचं आहे. त्यानंतर कायद्याची लढाई सुरु झाली. तेव्हा रेने माझ्या जवळ होती… पण मला सतत भीती असायची, कोर्टाने माझ्या बाजूने निकाल दिला नाही तर, ते रेनेला घेऊन जातील आणि ती मला आई म्हणत होती… तेव्हा वडिलांनी माझी खूप मदत केली… माझ्या मनात एकच विचार असायचा, माझ्या मुलीला ते माझ्यापासून दूर करु शकत नाहीत…’
‘मला माझ्या वडिलांवर खूप गर्व आहे… आपल्या देशात मुल दत्तक घेण्यासाठी वडील किंवा वडिलांसारख्या व्यक्तीची गरज असते… तर आज माझ्या वडिलांमुळे माझ्या मुली माझ्याकडे आहेत… कोर्टाने वडिलांना सांगितलं, तुमची आर्थिक बाजू भक्कम पाहिजे आणि अर्धी संपत्ती मुलाच्या नावावर करावी लागेल… अशात वडिलांनी कोर्टात सांगितल, मी फार काही श्रीमंत नाही. पण मी माझी सर्व संपत्ती मुलीच्या नावावर करायला आलो आहे…’
पुढे सुष्मिता म्हणाली, ‘अशात न्यायाधिशांनी माझ्या वडिलांना एक सल्ला दिला. असं केल्यास चांगल्या कुटुंबातील मुलगा तिच्यासोबत लग्न करणार नाही…’ यावर अभिनेत्रीचे वडील म्हणाले, ‘मी माझ्या मुलीचा सांभाळ कोणाची पत्नी होण्यासाठी नाही केला…’, असं सुष्मिता हिने एका मुलाखतीत सांगितलं होतं… अभिनेत्री तिच्या दोन दत्तक मुलींसोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.
