
Dharmendra Emotional Video: बॉलिवूडचे दिग्गज आणि लोकप्रिय अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाला 24 डिसेंबर रोजी एक महिना पूर्ण होणार आहे… पण आजही ते या जगात नाहीत… यावर विश्वास ठेवणं कठीणच आहे. धर्मेंद्र यांचं निधन झालं… पण असं म्हणतात की, कलाकार कधीच मरत नाही… त्याच्या कलेतून तो कायम जिवंत असतो… धर्मेंद्र यांच्याबाबतीत देखील असंच आहे. धर्मेंद्र जगात नाहीत, पण त्यांच्या आठवणी कायम कुटुंबियांच्या आणि चाहत्यांच्या मनात कायम राहतील… अशात धर्मेंद्र यांची एक शेवटची आठवण लेक ईशा देओल हिने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. सध्या धर्मेंद्र यांचा शेवटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एवढंच नाही तर, या व्हिडीओमध्ये धर्मेंद्र यांनी माफी देखील मागितली आहे…
सांगायचं झालं तर, व्हिडीओ धर्मेंद्र यांचा आगामी आणि शेवटचा ‘इक्किस’ सिनेमाच्या शुटिंग दरम्यानचा आहे. व्हिडीओमध्ये धर्मेंद्र प्रचंड भावुक दिसत आहेत.. ईशा हिने सिनेमाचा BTS व्हिडीओ पोस्ट केला आहे… सध्या व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे…
व्हिडीओमध्ये धर्मेंद्र म्हणत आहेत, सिनेमाच्या शुटिंगचा शेवटचा दिवस आहे. म्हणून आनंदी देखील आहे आणि दुःखी देखील… व्हिडीओमध्ये धर्मेंद्र सर्वांचे आभार मानताना दिसत आहेत. एवढंच नाही तर, ‘काही चूकलं असेल तर माफ करा..’ असं म्हणत धर्मेंद्र यांनी सिनेमाच्या टीमची माफी देखील मागितली…
धर्मेंद्र यांनी व्हिडीओमध्ये इक्कीस सिनेमाचा देखील उल्लेख केला आहे… भारत आणि पाकिस्तानातील लोकांनी सिनेमा नक्की पाहायला हवा… असं देखील त्यांनी व्हिडीओत सांगितलं आहे. वडिलांचा शेवटचा व्हिडीओ पोस्ट करत ईशा कॅप्शनमध्ये म्हणाली, ‘ते बेस्ट होते… आय लव्ह यू पापा…’, व्हिडीओवर कमेंट करत चाहत्यांनी प्रेम व्यक्त केलं आहे.
इक्कीस सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, दिग्दर्शक श्रीराम राघवन दिग्दर्शित हा सिनेमा अरुण खेत्रपाल यांच्या जीवनकथेवर आधारित एक युद्ध-नाटक आहे, ज्यामध्ये धर्मेंद्र यांनी त्यांच्या वडिलांची भूमिका साकारली आहे.