बिग बाॅसच्या निर्मात्यांवर आणि सलमान खान यांच्यावर गंभीर आरोप, हिमांशी खुराना हिचा मोठा खुलासा

बिग बाॅस हे कायमच चर्चेत असते. बिग बाॅसची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलइंग ही बघायला मिळते. बिग बाॅसचे 17 सीजन आता काही दिवसांमध्येच सुरू होईल. चाहते या सीजनची आतुरतेने वाट पाहात आहेत.

बिग बाॅसच्या निर्मात्यांवर आणि सलमान खान यांच्यावर गंभीर आरोप, हिमांशी खुराना हिचा मोठा खुलासा
| Updated on: Oct 11, 2023 | 4:31 PM

मुंबई : बिग बाॅस 13 चे सीजन सर्वात हिट आणि वादग्रस्त (Controversial) ठरले. या सीजनमध्ये टीव्ही मालिकेतील अनेक मोठे कलाकार सहभागी झाले. मात्र, या सीजनमध्ये मोठे वाद देखील बघायला मिळाले. बिग बाॅसच्या (Bigg Boss) इतिहासामध्ये सर्वाधिक चर्चेत ठरलेले सीजन हे 13 च आहे. या सीजनने जोरदार धमाका केला. शहनाज गिल हिला खरी ओळख ही बिग बाॅस 13 (Bigg Boss 13) मधूनच मिळालीये. शहनाज गिल आणि सिद्धार्थ शुक्ला यांच्या जोडीला प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिले.

बिग बाॅस 13 मध्ये हिमांशी खुराना हिने वाइल्ड कार्ड एंट्री केली. मात्र, बिग बाॅस 13 मध्ये फार जास्त काळ हिमांशी खुराना ही टिकू शकली नाही. हिमांशी खुराना हिला प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यश मिळाले नाही. हिमांशी खुराना आणि शहनाज गिल यांचा बिग बाॅसच्या घरात वाद बघायला मिळाला. यावेळी हिमांशी खुराना हिने शहनाजचे राजही उघडे केले.

हिमांशी खुराना ज्यावेळी बिग बाॅस 13 मधून बाहेर आली, त्यावेळी तिला जोरदार ट्रोल केले गेले. आताही हिमांशी खुराना हिला सतत सोशल मीडियावर ट्रोल केले जाते. हिमांशी खुराना आणि आसिम रियाज हे एकमेकांना डेट करत आहेत. आसिम रियाज आणि हिमांशी खुराना यांची लव्ह स्टोरी बिग बाॅसच्या घरातच सुरू झाली.

आता नुकताच हिमांशी खुराना हिने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये काही मोठे खुलासे करताना हिमांशी खुराना ही दिलीये. हिमांशी खुराना हिने या मुलाखतीमध्ये थेट बिग बाॅस आणि सलमान खान यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले. यानंतर आता सर्वांनाच मोठा धक्का बसल्याचे दिसतंय. यामुळे आता विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत.

हिमांशी खुराना हिने थेट म्हटले की,  त्याच्या लक्षात आले नाही, पण तुमच्याकडे सत्ता असेल तर तुम्ही कोणाचेही आयुष्य खराब करू शकता असे अजिबात नाही. असे नाही की मी तिथे बसू शकत नाही. परंतु तुम्ही लढाई सुरू केल्यानंतर तुम्ही देखील टार्गेट करता. तुम्ही अध्यात्माशी जोडलेले असता तेव्हा तुम्ही अगोदर स्वतःमध्ये शांतता आणता. हिमांशी खुराना बिग बाॅसच्या निर्मात्यांबद्दल नेहमीच खुलासे करते.