मुंबई: ‘बिग बॉस 16’मध्ये ‘वीकेंड का वार’ या खास एपिसोडच्या आधीच घरातील एक-दोन नाही तर तीन स्पर्धकांचं एलिमेशन पार पडलं आहे. श्रीजिता डे आणि साजिद खानसोबतच प्रेक्षकांचा लाडका अब्दु रोझिकसुद्धा या शोमधून बाहेर पडला आहे. अशातच आता बिग बॉसच्या घरात विजेतेपदासाठी तगडी चुरस रंगली आहे. तीन स्पर्धक आधीच ग्रँड फिनालेमध्ये पोहोचले आहेत. यात रॅपर एमसी स्टॅन, अभिनेता शिव ठाकरे आणि अभिनेत्री प्रियांका चहर चौधरी यांचा समावेश आहे.