
बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांच्या चित्रपटांपेक्षाही त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलची जास्त चर्चा झालेली आहे. तसेच असेही काही अभिनेते आहेत जे गायक आहेत ज्यांनी गायनासोबतच अभिनयातही आपलं नशीब आजमावलं आहे. असाच एक प्रसिद्ध गायक आहे ज्याची गाणी तर हीट ठरली पण चित्रपट मात्र फ्लॉप ठरला. पण असं असूनही तो कोट्यवधींचा मालक आहे. एवढंच नाही तर त्याचा आणि सलमान खानचा झालेला वादही बॉलिवूडमध्ये चर्चेचा विषय होता. तरीही हा गायक असलेला अभिनेता आज 129 कोटींचा मालक आहे. चला तर मग जाणून घेऊया या अभिनेत्याबद्दल.
जवळपास सगळेच चित्रपट फ्लॉप
हा अभिनेता आहे हिमेश रेशमिया आहे. जो मुख्यत: प्रसिद्ध गायक आहे.नुकताच त्याचा ‘बॅड अॅस रवी कुमार’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट 7 फेब्रुवारीला प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फक्त 4 दिवसांमध्ये 6.75 कोटींची कमाई केली. आणि या चित्रपटाचं बजेट होतं 20 कोटी. याचा अर्थ हा चित्रपट फ्लॉप ठरला आहे. अभिनेत्याने 2007 मध्ये ‘आपका सुरूर’ या चित्रपटातून अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. ज्यामध्ये हिमेश रेशमियासोबत हंसिका मोटवानी दिसली होती. त्यानंतर त्याने 1980 च्या दशकातील ‘कर्ज’चा रिमेक बनवला, तोही फ्लॉप ठरला. हा चित्रपट सर्वात मोठ्या फ्लॉपपैकी एक म्हणून देखील लक्षात ठेवला जातो.
फ्लॉप असूनही संपत्ती 129 कोटी रुपये
हिमेशने आतापर्यंत अनेक गाणी गायली आणि शक्यतो ती सर्व गाणी हिट ठरली. परंतु, 14 वर्षांमध्ये त्याने एकही हिट चित्रपट दिला नाही. आतापर्यंत त्याने 9 चित्रपटांमध्ये काम केलं आहे. जवळपास सर्वच फ्लॉप ठरली आहेत. तरी देखील हिमेश रेशमिया हा इंडस्ट्रीमधील एक लोकप्रिय अभिनेता आहे. मिडिया रिपोर्टनुसार, हिमेश रेशमियाची एकूण संपत्ती 129 कोटी रुपये आहे. एका गाण्यासाठी तो 15 लाख रुपये घेतो.
बायकोच्याच मैत्रिणीसोबत लग्न
असं असलं तरी, हिमेश रेशमिया हे इंडस्ट्रीतील एक लोकप्रिय नाव आहे. हिमेशचं प्रोफेशनलसोबतच वैयक्तिक आयुष्यही चर्चेत होतं. त्याची दोन लग्न झाली असून पहिलं लग्न कोमलसोबत झालं होतं. पण लग्नाच्या 22 वर्षांनंतर त्यांचा 2016 मध्ये घटस्फोट झाला. या लग्नापासून त्याला एक मुलगाही आहे. त्यानंतर हिमेशने त्याच्या एक्स-पत्नीची मैत्रीण सोनियासोबत दुसरं लग्न केलं. हिमेशचे त्याच्या एक्स-पत्नीच्या मैत्रिणीसोबत अफेअर होतं आणि त्यामुळेच त्यांचा घटस्फोट झाला असं म्हटलं जातं.आताही हिमेशची नवनवीन गाणी तयार करण्याची प्रोसेस सुरुच आहे. तो नेहमी नवीन गायकांना संधी देत असतो. शिवाय तो अनेक गाण्यांच्या शोमध्ये जज म्हणूनही आपली भूमिका निभावतो.