
लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री हिना खानने तिचा बॉयफ्रेंड लग्न केले आहे. स्तनाच्या कर्करोगाशी झुंजणाऱ्या या अभिनेत्रीने तिचा दीर्घकाळचा प्रियकर रॉकी जयस्वालसोबत कोर्ट मॅरेज केलं आहे. हिना आणि रॉकीच्या लग्नाचे फोटोही तिच्या सोशल मीडियावर तिने शेअर केले आहेत. चाहत्यांना हिनाच्या पतीबद्दल तिच्या सोशल मीडियावरून थोडंफार माहित आहे. पण नक्की रॉकी जयस्वाल कोण आहे? आणि तो नक्की काय करतो? याबद्दल चाहत्यांना जाणून घेण्याची उत्सुकता आहे. चला जाणून घेऊयात.
हिना खान आणि रॉकी जयस्वाल 2012-13 पासून एकत्र आहेत. हिनाने अनेकदा रॉकीसोबतचे तिचे फोटो शेअर केले आहेत. स्तनाच्या कर्करोगाशी झुंजत असताना रॉकीने तिची कशी काळजी घेतली याची झलक अभिनेत्रीने फोटो आणि व्हिडिओद्वारे दाखवली आहे. आता इतक्या वर्षांच्या नात्यानंतर, दोघांनी 4 जून रोजी लग्न केले.
रॉकी जयस्वाल
हिना खान मुस्लिम आहे, तर तिचा पती रॉकी जयस्वाल हिंदू आहे. 14 फेब्रुवारी 1989 रोजी पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे जन्मलेला रॉकी हा बनिया जातीचा आहे. त्याने सेंट्रल कॉलेजिएट स्कूलमधून शालेय शिक्षण घेतले आणि नंतर कलकत्ता विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले. रॉकीला तीन बहिणी आहेत ज्यांचे नाव निरजा, नीलम आणि रॉय जयस्वाल आहे.
हिना खानचा नवरा काय करतो?
रॉकी जयस्वाल हा व्यवसायाने चित्रपट निर्माता आहे. त्याचे हिरोज फॉर बेटर फिल्म्स नावाचे एक प्रॉडक्शन हाऊस आहे. रॉकी जयस्वालच्या प्रॉडक्शन हाऊस अंतर्गत ‘विशलिस्ट’, ‘डोरमन’ आणि ‘लाइन्स’ सारखे चित्रपट बनवले गेले आहेत. रॉकीने ‘ससुराल सिमर का’, ‘अग्निपरीक्षा’ आणि ‘जीव की: गंगा’ मध्ये कार्यकारी निर्माता म्हणून काम केले आहे. त्याने ‘ये रिश्ता क्या कहलाता है’, ‘साथ निभाना साथिया’ आणि ‘कुछ तो लोग कहेंगे’ मध्ये पर्यवेक्षक निर्माता म्हणूनही काम केले आहे.
रॉकी जयस्वालची नेट वर्थ
रॉकी स्वतःचा कपड्यांचा ब्रँड देखील चालवतो जो संपूर्ण भारतात डिलिव्हरी करतो. स्टार्स अनफोल्डेडच्या अहवालानुसार, रॉकी दरवर्षी सुमारे 60-70 लाख रुपये कमवतो आणि त्याच्याकडे 6 ते 7 कोटी रुपयांची मालमत्ता आहे.