
कॅन्सरशी झुंज देत असलेली टीव्ही अभिनेत्री हिना खानने गुपचूप लग्न केलं आहे. हिना गेल्या अनेक वर्षांपासून रॉकी जयस्वालला डेट करत होती. हिनाने सोशल मीडियावर तिच्या लग्नाचे फोटो शेअर करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. तिचे फोटो पाहून चाहत्यांनाही धक्का बसला. पण सर्वांनी त्या दोघांनाही अभिनंदन केलं आहे. हिना आणि रॉकीने कोणत्याही धामधुमीशिवाय अगदी साधेपणाने लग्न केलं आहे. ज्याचे फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत.
37 वर्षीय हिना खानने रॉकी जयस्वालला आपला जीवनसाथी बनवले आहे. त्यांच्या लग्नाचा कोणालाही अंदाज नव्हता. 4 जून 2025 रोजी हिनाने तिच्या इंस्टाग्रामवर थेट लग्नाचे फोटो शेअर केरून चाहत्यांना ही गुड न्यूज दिली आहे. त्यामुळे चाहत्यांसाठीही हा एक सुखद धक्का होता.
ग्नाचे फोटोंसोबत भावनिक पोस्ट
हिनाने रॉकीसोबतचे लग्नाचे फोटो शेअर करताना एक भावनिक पोस्टही लिहिली आहे, तिने म्हटलं आहे की, ‘दोन वेगवेगळ्या जगातून, आम्ही प्रेमाचे विश्व निर्माण केले. आमचे मतभेद नाहीसे झाले, आमची हृदये एक झाली, एक असे बंधन निर्माण झाले जे आयुष्यभर टिकेल. आम्ही आमचे घर आहोत, आमचा प्रकाश, आमची आशा आहोत आणि एकत्रितपणे आम्ही सर्व अडथळ्यांवर मात करतोय. आज, आमचे मिलन प्रेम आणि कायद्याने कायमचं एक झालं आहे. पत्नी आणि पती म्हणून आम्ही तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा मागतो.’ असं म्हणत तिने तिच्या लग्नाचं सुख अनुभवलं आहे.
जवळपास 11 वर्षांपासून सुरु असलेले नाते अखेर लग्नबंधनात
हिना ही जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगरची रहिवासी आहे आणि ती काश्मिरी मुस्लिम आहे. तिने एमबीए केले आहे. तिची पहिली मालिका ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ होती आणि त्यात तिने अक्षराची भूमिका करून सर्वांचे मन जिंकले होतं. या शोमध्ये रॉकी जयस्वाल देखील होता. तो पर्यवेक्षक निर्माता होता. इथूनच हिना आणि रॉकीची प्रेमकहाणी सुरू झाली. हिना आणि रॉकीने 2014 मध्ये डेटिंग सुरू केली आणि त्यांचे नाते जवळजवळ 11 वर्षांपासून सुरू आहे. हिनाने ‘बिग बॉस 11’ मध्ये रॉकी आणि तिच्या नात्याबद्दलचा खुलासा केला होता.
सध्या ती कॅन्सरसी झुंज देत असून तिच्या लग्नाच्या बातमीने चाहत्यांना धक्का
हिना गेल्या काही महिन्यांपासून स्तनाच्या कर्करोगाशी झुंज देत आहे. तिने अनेक वेळा केमोथेरपी घेतली आहे. ती सोशल मीडियाद्वारे तिच्या चाहत्यांना अपडेट देत राहते. आता ती बऱ्याच प्रमाणात बरी आहे. दरम्यान, तिने लग्न करून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.