AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनोज जरांगे गेल्यावेळी आलात, धिंगाणा केला घाण केली, आता… हिंदुस्थानी भाऊचे वादग्रस्त विधान, थेट..

Manoj Jarange Patil Hindustani Bhau Controversy : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना झाले. मात्र, त्यांच्या उपोषणाला पोलिसांनी परवानगी दिली नाही. अनेकजण जरांगे यांच्यावर टीका करताना दिसत आहेत. त्यातच हिंदुस्थानी भाऊ यांनी मोठे विधान केले.

मनोज जरांगे गेल्यावेळी आलात, धिंगाणा केला घाण केली, आता... हिंदुस्थानी भाऊचे वादग्रस्त विधान, थेट..
Hindustani Bhau and Manoj Jarange Patil
| Updated on: Sep 16, 2026 | 3:19 PM
Share

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना झाले. मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाला परवानगी देण्यात आली नाही. मात्र, तरीही जरांगे मोठ्या ताफ्यासह मुंबईकडे रवाना झाले. गेल्या वर्षी याच दिवसात जरांगे यांना आंदोलनासाठी परवानगी देण्यात आली होती. मात्र, यावेळी परवानगी देण्यात आली नाही. मनोज जरांगे पाटील यांनी तिसऱ्यांदा पोलिसांकडून परवानगी मागितली आहे. पण त्यावर पोलिसांनी निर्णय दिला नाही. मनोज जरांगे पाटील गेल्या 19 दिवसांपासून आंदोलन करत आहेत. 19 तारखेपासून त्यांचे मुंबईतील उपोषण आहे. त्यांनी सुरूवातीला 5 हजार लोकांची परवानगी मागितली होती. पण तो अर्ज रद्द करण्यात आला. आता 50 लोकांची परवानगी त्यांनी मागितली. मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघाले आहेत.यादरम्यानच सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर विकास पाठक अर्थात हिंदुस्थानी भाऊ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला.

हिंदुस्थानी भाऊने मनोज जरांगे यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी वादग्रस्त विधान केले. हिंदुस्थानी भाऊच्या विधानानंतर मराठा समाज आक्रमक भूमिका घेत आहे. मागच्या वर्षी गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत परिस्थिती बिघडताना दिसली. गेल्यावेळी आलात, धिंगाणा केला, घाण केली असे विधान थेट हिंदुस्थानी भाऊने केले.

जरांगे यांच्यावर टीका करताना हिंदुस्थानी भाऊने म्हटले की, आपले मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले की, सण सुरूवात मी 19 तारखेला मुंबईत येत आहे, गेल्या वेळी आलात तुम्ही त्यावेळी एवढा धिंगाना केला रस्त्यावर, मॉलमध्ये एवढी घाण केली की, तुम्ही सणाचीच तुम्ही वाट लावून टाकली. पूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सव साजरा होतो.यावेळीही तुम्ही येणार. लोकांचे सण खराब करणार. गेल्यावेळी तुम्ही तेच केले पाहिजे.

तुमच्या मागण्या पूर्ण करण्याचा आग्रह होता.त्यावेली तुम्ही सर्व मराठा बांधवांना सांगितले आम्ही जिंकलो.त्यावेळी तुमचा वकील म्हणाला, दादा एकदा पेपर तपासा. त्यानंतर थोड्या दिवसांनी सांगता की, तुम्हाला फसवले. ऐकून घ्या हे शिकलेले आहेत. गुन्हे दाखल झालेत. त्यांच्या आई वडिलांन एवढा खर्च करूनते लढतायत. मराठ्यांची आताची जी पिढी आहे, त्यांना तुम्ही बरबाद करत आहेत. तुमची भाषा काय आहेत. शिंद्या… विख्या… देव्या… हलक्यात घेता का तुम्ही? जेवढे पत्र आहेत, त्यांना सर्वांना तुम्ही शिव्या देतात.

Follow Us
कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा!
Radhakrishna Vikhepatil | कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा! राधाकृष्ण विखे पाटलांचं मनोज जरांगेंना आवाहन
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला
Nitin Nabin | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राजकीय कारण काय?
जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती
ChandrakantPatil | जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती; पुढे म्हणाले...
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी फडणवीस-नबीन; सिद्धिविनायक मंदिरात...
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी CM फडणवीस- नितीन नबीन; सिद्धिविनायक मंदिरात घेतले बप्पांचे दर्शन!
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष