AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुसऱ्या राज्यात मराठी माणसांना भाषेवरून मारलं तर..; हिंदुस्तानी भाऊचा राज ठाकरेंना सवाल

मराठी भाषेचा अपमान केल्याने एका रेस्टॉरंट मालकाला मनसे कर्मचाऱ्यांनी मारल्याचं म्हटलंय. त्यावरून आता हिंदुस्तानी भाऊने राज ठाकरे आणि मनसैनिकांना विनंती केली आहे. मराठी भाषेवरून आपल्याच हिंदू लोकांना मारू नका, अशी विनंती त्याने केली.

दुसऱ्या राज्यात मराठी माणसांना भाषेवरून मारलं तर..; हिंदुस्तानी भाऊचा राज ठाकरेंना सवाल
हिंदुस्तानी भाऊ, राज ठाकरेImage Credit source: Instagram
| Updated on: Jul 07, 2025 | 8:45 AM
Share

मराठी भाषेचा अपमान केल्यामुळे मीरा-भाईंदरमध्ये एका रेस्टॉरंट मालकाला मनसे कर्मचाऱ्यांनी मारलं होतं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. त्यानंतर मराठी भाषेच्याच मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे एकत्र आले. त्यांनी विजयी मेळावा घेतला. आता याप्रकरणी सोशल मीडिया स्टार ‘हिंदुस्तानी भाऊ’ने एक व्हिडीओ पोस्ट करत राज ठाकरे आणि मनसैनिकांना विनंती केली आहे. मराठी भाषेवरून आपल्याच हिंदू लोकांना मारणं चुकीचं असल्याचं त्याने म्हटलंय.

काय म्हणाल हिंदुस्तानी भाऊ?

“छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पावन नगरीमध्ये, या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा हे गर्वच नाही तर माज आहे. परंतु मराठी भाषेवरून इथं आलेल्या हिंदुस्तानमधल्या लोकांना, आपल्या हिंदू लोकांना मारणं चुकीचं आहे. शाळा असो किंवा कॉलेज.. तिथे मराठी भाषा शिकवलीच पाहिजे. यासाठी जेवढी ताकद तुम्हाला लावायची आहे, ती लावा. पूर्ण हिंदू समाज तुमच्यासोबत आहे. पण साहेब, गोरगरिबांना मारणं चुकीचं आहे. आज महाराष्ट्रातील अनेक मराठी लोक दुसऱ्या राज्यात शिकायला, नोकरी करायला गेले आहेत. तिथली लोकंही बघतात की आपल्या लोकांना मारलं जातंय. जर त्या लोकांनी तिथे मराठी लोकांसोबत असं केलं, तर आपण काय करणार? एखाद्याला मारणं खूप सोपं असतं, पण एकत्र आणणं खूप अवघड असतं,” असं तो म्हणाला.

या व्हिडीओमध्ये त्याने पुढे राज ठाकरे आणि मनसैनिकांना विनंती करत म्हटलंय, “बाळासाहेबांनंतर त्यांची एक सावली म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. तुम्ही हिंदुत्वासाठी बोला. प्रत्येक शाळेत, कॉलेजमध्ये मराठी भाषा शिकवलीच पाहिजे, बोललीच पाहिजे. पण गोरगरीबांना मारून, त्यांना जबरदस्ती करून.. तुम्ही आपल्या हिंदुत्वाला लांब करताय. ते पण हिंदूच आहेत. तुमच्यापासून ते लोक लांब जात आहेत. राजकारण करा पण आज तुम्हा राजकारण कोणासोबत करताय? ज्या लोकांनी बाळासाहेबांचा सन्मान नाही केला, काँग्रेससोबत जाणाऱ्यांशी तुम्ही आज युती करून बसला आहात. जे श्रीरामांबद्दल चुकीचं बोलले, त्यांच्यासोबत तुम्ही युती करणार का? हिंदू समाज तुमच्याकडे खूप अपेक्षेनं बघतोय, त्यांचा विश्वास तोडू नका. संपलेला पक्ष असं तुम्हाला ते बोलले. मी मनसैनिकांनाही विनंती करतो की, तेसुद्धा हिंदू आहेत, त्यांना नका मारू. आपल्या लोकांना मारू नका.”

Follow Us
मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
Sanjay Raut Speech: मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही बनले...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही कसे बनले ‘सामना’चे संपादक? राज ठाकरेंनी सांगितला किस्सा!
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले...
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले, तुरुंगात पुस्तक लिहिलं अन्...
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
माय गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांच्या आरतीने वेधले जगाचे लक्ष!
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट जारी!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची...
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची सूत्रे हाती घेतली
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट