
श्वेता तिवारीची लेक पलक तिवारी सध्या सोशल मीडिया क्वीन बनण्याची तयारी करत आहे. ती सतत नवनवीन फोटो शेअर करत असते. आता पलकनं काळ्या बोल्ड ड्रेसमध्ये फोटोशूट करत चाहत्यांना घायाळ केलं आहे.

पलक तिवारी अनेक दिवसानंतर सोशल मीडियावर अतिशय ग्लॅमरस स्टाईलमध्ये कमबॅक केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून ती सतत हॉट फोटोशूट करत आहे.

आता पलकनं ब्लॅक कलरच्या बोल्ड ड्रेसमध्ये खूप मोहक फोटो शेअर केले आहेत. फोटोमध्ये पलक तिवारीनं ब्लॅक कलरचा हायस्लिट आणि ऑफ-शोल्डर ड्रेस परिधान केला आहे.

तिचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. पलक तिवारी चाहते अनेक दिवसानंतर तिला सोशल मीडियावर या धमाकेदार अंदाजात पाहून आनंदीत आहेत.

पलक तिवारीचा पहिला चित्रपट 'रोजी- द सैफ्रॉन चैप्टर' या महिन्यात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन विशाल मिश्रा यांनी केलं आहे, तर विवेक ओबेरॉय, प्रेरणा व्ही अरोरा निर्मित हा चित्रपट आहेत.