एका गाण्यासाठी किती पैसे घेत श्रेया घोषाल, या देशात साजरा केला जातो श्रेया घोषाल डे

बॉलिवूडची गायिका श्रेया घोषाल हिने आज आपल्या आवाजाच्या जोरावर अनेक हिट गाणे दिले आहेत. अनेक सिनेमे तिच्या गाण्यांमुळे हिट ठरले आहेत. श्रेया घोषालचे लाखो चाहते देखील आहेत. सोशल मीडियावर देखील ती खूप सक्रीय असते. पण तुम्हाला माहितीये का की ती एका गाण्यासाठी किती पैसे घेते.

एका गाण्यासाठी किती पैसे घेत श्रेया घोषाल, या देशात साजरा केला जातो श्रेया घोषाल डे
| Updated on: Mar 16, 2024 | 5:43 PM

Shreya Ghoshal Fees : प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल हिने आपल्या सुरेल आवाजाने अनेक गाणे गायले आहेत जे लोकप्रिय झाले आहेत. तिच्या आवाजने अनेकांना वेड लावले आहे. आपल्या आवाजाच्या जादूने अनेक चित्रपट हिट करण्यात श्रेया घोषालचा महत्त्वाचा वाटा आहे. श्रेया घोषालने बॉलिवूडमध्ये आतापर्यंत अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत. खूप कमी वयात तिने मोठं यश मिळवलं आहे. श्रेया घोषाल आज बॉलिवूडच्या दिग्गज संगीतकारांच्या यादीत आहे. आज तिने गाणे गात आणि अनेक स्टेज शो करत करोडोंची संपत्ती कमवली आहे.

श्रेया घोषालचे अलिशान घर

बॉलिवूड सेलिब्रिटींप्रमाणेच श्रेया घोषाल देखील आलिशान घरात रहाते. कोलकाता आणि मुंबईत तिचे घर आहे. श्रेया घोषाल ही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांसोबत कनेक्ट असते. ती तिचे सुंदर घराचे फोटो आणि व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करत असते.

एका गाण्यासाठी किती करते चार्ज

बॉलिवूड गायिका श्रेया घोषाल एका गाण्यासाठी 20-25 लाख रुपये घेते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, श्रेया घोषालची एकूण संपत्ती 182 कोटी रुपये आहे. श्रेया घोषालला चार राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाले आहेत.

फक्त १६ वर्षांची असताना श्रेया घोषालने पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळवला होता. श्रेया घोषालची आई देखील एक चांगली गायिका आहे. त्यामुळे आधापासूनचे तिला गाण्याची आवड होती. वयाच्या अवघ्या ४ व्या वर्षी श्रेया घोषालने आईकडून संगीताचे धडे घेण्यास सुरुवात केली होती.

ए.आर. रहमान, प्रीतम, अनु मलिक, हिमेश रेशमिया यांसारख्या दिग्गज संगीतकारांसोबत श्रेया घोषालने काम केले आहे. श्रेया घोषालला आतापर्यंत 6 वेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. ‘ओहायो’ या अमेरिकन देशाचे गव्हर्नर टेड यांनीही श्रेयाच्या सन्मानार्थ २६ जून रोजी श्रेया घोषाल दिवस साजरा करण्याची घोषणा केली आहे.

महागड्या गाड्यांची आवड

गायिका श्रेया घोषालकडे महागड्या गाड्यांचे कलेक्शन आहे. तिच्याकडे मर्सिडीज, बीएमडब्ल्यू सीरिजच्या गाड्या आहेत. श्रेया घोषालने बंगाली, कन्नड, तमिळ, तेलुगू, भोजपुरी, मराठी, उर्दू, पंजाबी आणि मल्याळम भाषांमध्ये अनेक गाणी गायली आहेत.