
लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी गेल्या काही महिन्यांपासून बऱ्याच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. हास्यजत्रेपासून प्राजक्ता खऱ्या आयुष्यात कशी आहे याबद्दल लोकांना जास्त चांगल्याप्रकारे समजू लागलं.
अभिनेत्री असण्यासोबतच यशस्वी व्यावसायिका
प्राजक्ताने गेल्या काही वर्षांपासून खूप मोठे निर्णय घेत ते यशस्वी करून दाखवले आहेत. केवळ अभिनय क्षेत्रच नव्हे तर व्यावसायिकदृष्ट्याहीने तिने बरीच प्रगती गेली आहे. त्यामुळे अभिनेत्री असण्यासोबतच यशस्वी व्यावसायिका अशी नवीन ओळख तिने निर्माण केली आहे.
प्राजक्ताच्या फार्महाऊसबद्दल सर्वांनाच आकर्षण
प्राजक्तराज या दागिण्यांच्या ब्रँडनंतर प्राजक्ताने हॉटेल इंडस्ट्रीमध्ये एन्ट्री केली आहे. तिने एक फार्महाऊस खरेदी केलं. फुलवंती चित्रपटाच्या माध्यमातून तिने निर्माती म्हणूनही काम पाहिल. असे अनेक धाडसी निर्णय तिने घेतले. पण बऱ्याच जणांना तिच्या या फार्महाऊसबद्दल फार आकर्षण आहे.
हास्यजत्रेच्या टीमसोबत ती बऱ्याचदा तिच्या फार्महाऊसवर वेळ घालवातान दिसते. दरम्यान तिचे फार्महाऊस तिने पर्यटकांसाठी खुलं केलं आहे. पण तुम्हाला माहितीये का की या फार्महाऊसमध्ये जर तिला राहायचं असेल तर तिथलं एक दिवासाचं किती भाड आहे ते. चला जाणून घेऊयात.
3 बीएचके व्हिला अन् बराच खर्च
प्राजक्ताच्या फार्महाऊसचं नाव ‘प्राजक्तकुंज’आहे. आजुबाजूला डोंगर रांगा, हिरवीगार झाडी,निळंशार पाणी अशा निर्सगाच्या कुशीत तिचं हे आलिशान फार्महाऊस आहे. प्राजक्ताने तिचं फार्महाऊस भाडेतत्वावर देण्यास सुरुवात केलं आहे. तिचा हा 3 बीएचके व्हिला आहे. फार्महाऊसमध्ये एक दिवसांसाठी जर राहायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी बक्कळ पैसा मोजावा लागेल.
प्राजक्ताने सध्या तिचं फार्महाऊस ‘Stay Leisurely’ यांच्याकडे हँडओव्हर केलं आहे. त्यांच्या ऑफिशिअल साईटवर या फार्महाऊसची सगळी माहिती देण्यात आली असून त्याचं एक दिवसाचं भाडं किती हेदेखील सांगण्यात आलं आहे.
प्राजक्ता माळीच्या फार्महाऊसमध्ये काय सोयी?
प्राजक्ता माळीचं फार्महाऊस सुंदर व्ह्यू, मोठ्या खोल्या, ओपन स्विमिंग पूल, आकर्षक फर्निचर अशा सुखसोयींनी परिपूर्ण आहे.‘द ग्रीन मोन्टाना’ या नावाने तिने हा सुंदर व्हिला एका नामांकित कंपनीकडे रजिस्टर केला आहे. यामुळे आता कोणतेही पर्यटक रजिस्टर वेबसाईटवर रितसर बुकिंग करून प्राजक्ताच्या बंगल्यात राहू शकतात.
प्राजक्ताच्या फार्महाऊसवर एकावेळी तब्बल 15 जण राहू शकतात. या बंगल्यावर येणाऱ्या पर्यटकांना किचन, ओव्हन, गॅस, स्विमिंग पूल, गार्डन अशा सगळ्या सुविधा देण्यात आल्या आहेत. परंतु, पर्यटक येथे जेवण बनवू शकत नाहीत. त्यांना केवळ जेवण गरम करता येईल. याशिवाय या फार्महाऊसमध्ये पाळीव प्राणी आणण्यास बंदी आहे.
फार्महाऊसचं एका दिवसाचं भाडं किती?
या फार्महाऊसचं वीकेंडला (शनिवार-रविवार) एका दिवसाचं भाडं तब्बल 30 हजार रुपये आहे. तसेच सोमवार ते शुक्रवारदरम्यान पर्यटकांना 17 ते 20 हजारापर्यंत एका दिवसाचं भाडं आहे. लागोपाठ येणाऱ्या सुट्ट्या, पर्यटकांची गर्दी पाहून यामध्ये बदल केला जाऊ शकतो.
पर्यटकांना जेवणासाठी खर्च वेगळा करावा लागेल किंवा जवळच्या हॉटेलमधून पर्यटक जेवण मागवू शकतात अशी सोय करण्यात आली आहे. त्यामुळे जर तुम्हाला राहायला जायचं असेल तर खूप पैसा खर्च करावा लागणार हे नक्की.
मात्र हौसेला मोल नसतं असं म्हणतात. त्यामुळे ज्यांना प्राजक्ता माळीचं फार्महाऊस पाहण्याची, तिथे राहण्याची उत्सुकता असेल असे हौशी लोकं, पर्यटक नक्कीच एवढा पैसा खर्च करून राहायला जातात. दरम्यान, प्राजक्ता माळीच्या नव्या फार्महाऊसचे फोटो पाहून मराठी कलाविश्वातील कलाकारांनी तिचं कौतुक केलं आहे.