
सध्या दहीहंडीचा मोठा उत्सव साजरा झाला. अनेक ठिकाणी मोठे कार्यक्रम ठेवण्यात आले होते. तसेच दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. त्यातीलच एक होती गौतमी पाटील. गौतमी पाटील हे नाव सेलिब्रिटींपेक्षा कमी नाही. तिचे लाखोंने चाहते आहेत. तिचे कार्यक्रम नेहमीच हाऊसफुल्ल असतात.
गौतमी लावणी नृत्यामुळे आणि तिच्या मॉडर्न स्टाईलमुळे लोकप्रिय
गौतमी पाटील तिच्या खास लावणी नृत्यामुळे आणि तिच्या मॉडर्न स्टाईलमुळे खूप लोकप्रिय आहे. विशेषतः ग्रामीण भागातील तरुणांमध्ये तिचा मोठा चाहता वर्ग आहे. गौतमीने देखील दहीहंडीच्या दिवशी कार्यक्रमांना हजेरी लावली होती. गौतमी पाटील मुंबईच्या बोरिवली येथील दहीहंडी उत्सवात सहभागी झाली होती.
दहीहंडी उत्सवाला हजेरी
यावेळी देखील तिला पाहण्यासाठी सर्वच उत्सुक होते. कार्यक्रमाला तिने नृत्य सादर करून सर्वांचं कौतुक मिळवलं. उत्सवाला हजेरी लावलेल्या प्रत्येकाने तिच्या नृत्यांचा आनंद लुटला. तसेच तिने देखील हा उत्सव, कार्यक्रम मनापासून एन्जॉय केला.
एका शोसाठी गौतमी पाटील किती पैसे घेते?
गौतमीबद्दल जाणून घेण्याची तशी सर्वांनाच उत्सुकता असते. फार गरीबीतून लाखो चाहत्यांच्या गराड्यात स्वत:ला पाहणाऱ्या गौतमीने नक्कीच तेवढी मेहनत घेतली आहे. त्यामुळे तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. तसेच एका शोसाठी गौतमी पाटील किती पैसे घेते? हा प्रश्न सुद्धा अनेकदा तिच्या चाहत्यांना पडलेला असतो. गौतमीला देखील हा प्रश्न कितीवेळा तरी विचारण्यात आला आहे.
एका शोसाठी गौतमी बक्कळ रक्कम घेते
मीडिया रिपोर्ट्सनुसार, गौतमी पाटील एका शोसाठी सुमारे 3 ते 5 लाख रुपये घेते. तिचा आणि तिच्या टीमचा महिन्याचा एकूण खर्च पाहता, तिची कमाईही मोठी आहे. एका महिन्यात तिच्या टीमची कमाई 45 ते 50 लाख रुपयांच्या घरात जाते, असं म्हटलं जातं. तसेच तिचे सर्व कार्यक्रम हे हाऊसफु्ल्लच असतात. तसेच तिने आता मालिकेत पाहुणी कलाकार म्हणून काम केलं आहे तसेच चित्रपटातही तिने पाऊल ठेवलं आहे त्यामुळे शोसाठी घेत असलेल्या तिच्या मानधनात नक्कीच वाढ झाली आहे.
महाराष्ट्रातील सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या कलाकारांपैकी एक
तसेच स्थानिक ग्रुप्स आणि उत्सव कमिटी गौतमीला आपल्या कार्यक्रमात बोलवण्यासाठी मोठी रक्कम देतात, ज्यामुळे तिची फी आणखी वाढली असण्याची शक्यता आहे. त्यामुळेच ती महाराष्ट्रातील सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या कलाकारांपैकी एक बनली आहे.