हृतिक रोशनचा लग्नाचा 24 वर्षे जुना व्हिडीओ व्हायरल; नेटकऱ्यांकडून प्रतिक्रियांचा वर्षाव

हृतिक आणि सुझानचा 2014 मध्ये घटस्फोट झाला. या दोघांना दोन मुलं आहेत. घटस्फोटानंतर सुझान ही अर्सलानला डेट करतेय. तो बिग बॉस फेम अली गोणीचा भाऊ आहे. तर दुसरीकडे हृतिक हा अभिनेत्री सबा आझादला डेट करतोय.

हृतिक रोशनचा लग्नाचा 24 वर्षे जुना व्हिडीओ व्हायरल; नेटकऱ्यांकडून प्रतिक्रियांचा वर्षाव
हृतिक रोशन आणि सुझान खान
Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 11, 2024 | 11:18 AM

बॉलिवूडमध्ये अनेक जोड्या घटस्फोटानंतरही चर्चेत आहेत. अशीच एक जोडी म्हणजे अभिनेता हृतिक रोशन आणि सुझान खान. या जोडीचे आजही असंख्य चाहते आहेत. घटस्फोटानंतर दोघांचे मार्ग वेगळे झाले, दोघं नव्या पार्टनरसोबत आयुष्यात पुढे जात आहेत.. मात्र या दोघांविषयी आजही अनेकांच्या मनात सहानुभूतीची भावना आहे. हृतिक आणि सुझान यांनी विभक्त व्हायला पाहिजे नव्हतं, असं अनेकांना आजही वाटतं. अशातच या दोघांच्या लग्नाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. या व्हिडीओमध्ये सर्वसामान्य लग्नसोहळ्यांप्रमाणेच हृतिक आणि सुझानच्याही लग्नात वरमाळा घालताना चढाओढ पहायला मिळतेय. त्यानंतर हृतिक सुझानसमोर त्याचं प्रेम व्यक्त करतो आणि दोघं डान्स करू लागतात.

इन्स्टाग्रामवर एक फॅन पेजने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये हृतिक आणि सुझान यांच्यात वरमाळा घालताना चढाओढ झालेली पहायला मिळतेय. त्यानंतर दोघं एकमेकांना प्रत्येक कठीण काळात साथ देण्याचं वचन देतात. या आनंदाच्या क्षणी हृतिक आणि सुझान एकमेकांचा हात हातात घेऊन डान्ससुद्धा करतात. या व्हिडीओवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय. ‘दोघं इतके परफेक्ट दिसतायत, तरी का वेगळे झाले’, असा प्रश्न एका युजरने विचारला. तर ‘इतके सुंदर क्षण एकत्र अनुभवल्यानंतर कोणी घटस्फोट कसं घेऊ शकतं’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘हृतिकला या लग्नामुळे 200 कोटी रुपये मोजावे लागले’, असंही एका युजरने लिहिलं आहे. घटस्फोटानंतर पोटगी म्हणून हृतिकने सुझानला 200 कोटी रुपये दिल्याचं म्हटलं जातं.

पहा व्हिडीओ

हृतिक रोशनने एका पार्टीत सुझानला पहिल्यांदा पाहिलं होतं आणि पाहताच क्षणी तो तिच्या प्रेमात पडलाहोता. त्यावेळी हृतिकने अभिनेता म्हणून काम करण्यास सुरुवात केली नव्हती. 2000 मध्ये हृतिकने ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटामुळे त्याला रातोरात प्रचंड प्रसिद्धी मिळाली. त्यावेळी हृतिकला लग्नासाठी असंख्य मागण्या आल्या होत्या. मात्र त्याच वर्षी हृतिकने सुझान खानशी लग्न केलं. या दोघांना दोन मुलं आहेत. लग्नाच्या 13 व्या वाढदिवसाच्या एक आठवडाआधी या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आता हृतिक हा अभिनेता सबा आझादला डेट करतोय. तर सुझान ही ‘बिग बॉस’ फेम अली गोणीचा भाऊ अर्सलान गोणीला डेट करतेय.