AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हृतिकची पूर्व पत्नी एअरपोर्टवरून माघारी परतली; नेटकरी म्हणाले ‘क्रिशला सांगितलं तर..’

अभिनेता हृतिक रोशनची पूर्व पत्नी सुझान खान ही अर्सलान गोणीला डेट करतेय. नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी दोघं मुंबईबाहेर जाण्यासाठी निघाले होते. मात्र एअरपोर्टवरूनच त्यांना परतावं लागलं. सुझान आणि अर्सलानचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हृतिकची पूर्व पत्नी एअरपोर्टवरून माघारी परतली; नेटकरी म्हणाले 'क्रिशला सांगितलं तर..'
Arslan Goni and Sussane KhanImage Credit source: Instagram
| Updated on: Dec 30, 2023 | 1:46 PM
Share

मुंबई : 30 डिसेंबर 2023 | अभिनेता हृतिक रोशनची पूर्व पत्नी सुझान खान तिच्या खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत असते. 2023 या वर्षाच्या शेवटी बरेच सेलिब्रिटी सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी परदेशात जात आहेत. अशावेळी सुझाननेही बॉयफ्रेंड अर्सलान गोणीसोबत ट्रिपचा प्लॅन केला आहे. नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी ही जोडी सुट्टीवर जात आहे. शनिवारी सकाळी या दोघांना मुंबई एअरपोर्टवर पाहिलं गेलं. यावेळी पापाराझींनी त्यांचा व्हिडीओ शूट केला. मात्र एअरपोर्टच्या आत प्रवेश करण्यापूर्वी असं काही घडलं, ज्यामुळे अर्सलान आणि सुझानला पुन्हा माघारी घरी जावं लागलं. या व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांकडून भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत.

मुंबईबाहेर फिरायला जाण्यासाठी सुझान आणि अर्सलान शनिवारी सकाळी मुंबई एअरपोर्टवर पोहोचले. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये सुझान आणि अर्सलान हे एअरपोर्टच्या गेटवर येतात. मात्र जेव्हा त्यांना ओळखपत्र आणि पासपोर्ट दाखवण्यास विचारलं जातं, तेव्हा अर्सलान गडबडतो. सुझान तिची कागदपत्रं अधिकाऱ्यांना दाखवते, पण अर्सलानला त्याचा पासपोर्ट सापडत नाही. यावेळी दोघं एकमेकांशी काही बोलतात आणि पुन्हा माघारी निघू लागतात. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

‘क्रिशला सांगितलं असतं तर त्याने आणून दिलं असतं’, असं एकाने लिहिलं. तर काहींनी हृतिक रोशनचे हास्यास्पद GIF व्हिडीओ पोस्ट केले आहेत. ‘हृतिक रोशन असता तर क्रिश बनून पासपोर्ट आणून दिला असता’, अशीही मस्करी नेटकऱ्यांनी केली. सुझानचा पूर्वाश्रमीचा पती आणि अभिनेता हृतिक रोशनने ‘क्रिश’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. चित्रपटातील क्रिशकडे काही सुपरपॉवर्स असतात, त्यामुळे तो उडून कुठेही जाऊ शकतो, असं दाखवण्यात आलं आहे. यावरूनच नेटकऱ्यांनी सुझान आणि अर्सलानची मस्करी केली आहे.

हृतिक आणि सुझानचा 2014 मध्ये घटस्फोट झाला. या दोघांना दोन मुलं आहेत. घटस्फोटानंतर सुझान ही अर्सलानला डेट करतेय. तो बिग बॉस फेम अली गोणीचा भाऊ आहे. तर दुसरीकडे हृतिक हा अभिनेत्री सबा आझादला डेट करतोय. हृतिक आणि सुझान यांच्यात घटस्फोटानंतरही चांगली मैत्री असल्याचं पहायला मिळतं. इतकंच नव्हे तर हृतिक आणि सबाच्या फोटोंवर सुझान प्रेमाने कमेंट्स करतानाही दिसते. या चौघांच्या मैत्रीला नेटकऱ्यांनी अनेकदा ट्रोल केलं.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.