Hrithik Roshan: ‘मुलींबद्दल तुझी निवड प्रचंड घाणेरडी..’, हृतिक रोशनने असं केलं तरी काय? नेटकऱ्यांनी साधला निशाणा

Hrithik Roshan: अभिनेता हृतिक रोशन याच्या नावाची चर्चा अनेक महिलांसोबत रंगली. सुझान खान हिच्यासबोत लग्नानंतर देखील हृतिक याच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या. ज्यावर अनेकांनी संताप व्यक्त केला. आता देखील अनेक नेटकऱ्या हृतिक याच्यावर निशाणा साधाला आहे.

Hrithik Roshan: मुलींबद्दल तुझी निवड प्रचंड घाणेरडी.., हृतिक रोशनने असं केलं तरी काय? नेटकऱ्यांनी साधला निशाणा
Hrithik Roshan
| Updated on: Nov 01, 2026 | 2:37 PM

Hrithik Roshan: अभिनेता हृतिक रोशन आता पूर्वीप्रमाणे मोठ्या पडद्यावर सक्रिय नसतो. हृतिक प्रोफेशनल आयु्ष्यामुळे देखील चर्चेत असते. सुझान खान हिला घटस्फोट दिल्यानंतर अभिनेत्याच्या आयुष्यात सबा आजाद हिची एन्ट्री झाली. सांगायचं झालं तर आज, सबा हिचा वाढदिवस आहे आणि तिच्यासाठी हृतिक याने खास पोस्ट केली आहे. सबा हिने काही फोटो पोस्ट करत अभिनेत्याने प्रेम व्यक्त केलं. पण अनेकांनी हृतिकच्या पोस्टवर निशाणा साधला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त हृतिक याच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.

सबा हिच्यासाठी हृतिक रोशन याची पोस्ट…

Loading...

1 नोव्हेंबर रोजी सबा 40 वर्षांची झाली आहे. गर्लफ्रेंडला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत अभिनेता म्हणतो, ‘कोणी तरी मला तुझ्याबद्दल विचारत होतं, पण मी त्यांना सांगितलं, तिच्याबद्दल मला काहीही बोलायचं नाही. कारण तू माझ्यासाठी प्रचंड खास आहेस. जेव्हा त्यांनी हट्टाने विचारलं, तेव्हा मी म्हणालो, ‘बरं, असा विचार कर समजा मुंबईवरून एखाद्या दूरच्या ठिकाणी जाण्यासाठी विमानाचे दोन पर्याय आहेत. एक थेट जाणारी फ्लाईट, जी खूप सोपी आणि आरामदायक असेल!’

 

 

हृतिक पुढे लिहितो, ‘दुसरी फ्लाईट अशी असावी जी 8 वेगवेगळ्या शहरांमधून जाईल, जिथे प्रत्येक ठिकाणी तासनतास वाट पाहावी लागेल आणि कदाचित पुढची कनेक्टिंग फ्लाईट चुकण्याची भीतीही असेल. जर गोष्ट तुझ्यासोबत असण्याची असेल, तर मी दुसरा पर्याय निवडेन. जाणीवपूर्वक. प्रत्येक वेळी.’

हृतिक पुढे लिहितो, ‘कारण तुझ्यासोबत, सबा, प्रत्येक साधा क्षण, प्रत्येक प्रतीक्षा, आपण ठरवलेल्या मार्गावरून जेव्हा जेव्हा आपण थोडं भरकटतो, तेव्हा ते सगळं आपोआप एका रोमांचक प्रवासात बदलून जातं. आय लव्ह यू. हॅपी बर्थडे!” सध्या अभिनेत्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नेकऱ्यांनी साधला निशाणा

गर्लफ्रेंडसाठी हृतिकने केलेली पोस्ट अनेकांना आवडली आहे, तर अनेकांनी अभिनेत्रीवर निशाणा साधला आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘मुलींबद्दल तुझी निवड प्रचंड घाणेरडी आहे’, तर दुसरा नेटकरी म्हणाला, ‘भावा हे सगळं थांबव आणि सिनेमांकडे लक्ष दे’, तिसरा नेटकरी म्हणतो, ‘भावाने मर्सिडीजऐवजी अल्टो निवडली.’, सध्या सर्वत्र हृतिकच्या पोस्टची चर्चा सुरु आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us