Hrithik Roshan याच्या गर्लफ्रेंडने अखेर दुःख व्यक्त केलंच; दोघांमध्ये नक्की झालं तरी काय?

Hrithik Roshan | 'माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न आणि...', हृतिक रोशन याच्या गर्लफ्रेंडने अखेर बोलून दाखवलंच..., नक्की झालंय तरी काय? सध्या सर्वत्र अभिनेत्याची गर्लफ्रेंड सबा आझाद हिच्या वक्तव्याची चर्चा... चाहत्यांना देखील बसला मोठा धक्का... काय आहे सत्य?

Hrithik Roshan याच्या गर्लफ्रेंडने अखेर दुःख व्यक्त केलंच; दोघांमध्ये नक्की झालं तरी काय?
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 02, 2023 | 1:07 PM

मुंबई | 2 ऑक्टोबर 2023 : अभिनेता हृतिक रोशन सध्या अभिनेत्री आणि गायक सबा आझाद हिच्यासोबत असलेल्या नात्यामुळे चर्चेत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दोघे एकत्र आहे. पहिली पत्नी सुझान खान हिला घटस्फोट दिल्यानंतर अभिनेता हृतिक रोशन, सबा आझाद हिला डेट करत आहे. सबा, हृतिक याच्यासोबत असलेल्या नात्यामुळे कायम चर्चेत असते. पण आता अभिनेत्री तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. सबा आझाद हिने खासगी आयुष्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे अनेक गोष्टी समोर आल्या आहेतच. सध्या सर्वत्र अभिनेत्याची गर्लफ्रेंड सबा आझाद हिच्या वक्तव्याची चर्चा रंगत आहेत. अनेक वर्षांनंतर सबा खासगी आयुष्याबाबत व्यक्त झाली आहे.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत सबा हिने खासगी आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत. ‘लोकं माझ्याबद्दल काय विचार करतात, या गोष्टीकडे मी लक्ष दिलं तर, मी आयु्ष्यात काहीही करु शकणार नाही. जी लोकं माझी माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करतात, त्यांना माझ्या खासगी आयुष्याबद्दल काहीही माहिती नाही. मी खऱ्या आयुष्यात कशी आहे लोकांनी माहिती नाही.’ असं अभिनेत्री म्हणाली.

दरम्यान, सबा हृतिक याच्यासोबत असलेल्या नात्यामुळे अनेकदा ट्रोल करण्यात आलं. सोशल मीडियावर देखील दोघांच्या नात्याबद्दल अनेक चर्चा रंगलेल्या असतात. पण रंगणाऱ्या चर्चा आणि इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करत हृतिक आणि सबा यांनी फक्त आणि फक्त त्यांच्या भावनांना अधिक महत्त्व दिलं. सबा हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री ‘Who is your gynac’ या वेब सीरिजमुळे देखील चर्चेत आहे.

कोण आहे सबा आझाद?

सबा आझाद देखील एक अभिनेत्री आहे. सबा बिने २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दिल कब्बडी’ सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. एवढंच नाही तर अनेक लघूचित्रपटांमध्ये देखील हृतिक याच्या गर्लफ्रेंडने काम केलं आहे. अभिनयासोबतच सबा हिला संगीत क्षेत्रात देखील सक्रिय आहे. सोशल मीडियावर देखील सबा कायम सक्रिय असते. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

अभिनेते नसीरुद्दीन शाह याच्या मुलगा इमाद शाह याच्यासोबत सबा ‘मॅडबॉय/ मिंक’ बॅन्डमध्ये देखील काम करते. सबा आझाद हिच्या नेटवर्थबद्दल सांगायचं झालं तर, हृतिक याची गर्लफ्रेंड वर्षाला तब्बल ५ ते ७ कोटी रुपयांचा कमाई करते. सोशल मीडियावर देखील सबा कायम सक्रिय असते…