Hrithik Roshan: नवीन वर्षात हृतिक रोशनने पोस्ट केले थक्क करणारे फोटो; 48 व्या वर्षी फिटनेस पाहून चाहते हैराण!

सुपर टोन्ड ॲब्स, फिट बॉडी.. नव्या वर्षाच्या सुरुवातीला हृतिककडून चाहत्यांना खास ट्रीट; फोटोवर कमेंट्सचा वर्षाव

Hrithik Roshan: नवीन वर्षात हृतिक रोशनने पोस्ट केले थक्क करणारे फोटो; 48 व्या वर्षी फिटनेस पाहून चाहते हैराण!
Hrithik Roshan
Image Credit source: Instagram
| Updated on: Jan 02, 2023 | 12:27 PM

मुंबई: नवीन वर्षाच्या सुरुवातीला अभिनेता हृतिक रोशनने चाहत्यांना खास ट्रीट दिली आहे. बॉलिवूडमध्ये सर्वांत फिट अभिनेत्यांमध्ये हृतिकचा उल्लेख आवर्जून केला जातो. आता नुकतेच त्याने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. वयाच्या 48 व्या वर्षी त्याची फिटनेस आणि ॲब्स पाहून चाहते थक्क झाले आहेत. ‘ऑलराइट.. लेट्स गो’ असं कॅप्शन देत त्याने हे फोटो पोस्ट केले आहेत.

या फोटोंमध्ये हृतिक टी-शर्ट वर घेऊन त्याचे 6 पॅक ॲब्स दाखवताना दिसतोय. सुपर टोन्ड ॲब्स आणि फिटनेस पाहून चाहते थक्क झाले आहेत. त्याच्या या फोटोंवर सर्वसामान्य चाहत्यांसोबतच बॉलिवूड सेलिब्रिटींकडूनही लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.

‘जुना हृतिक परतलाय’ असं एका युजरने लिहिलं. तर ‘हृतिकच्या ॲब्सलाही ॲब्स आहेत’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘मला फक्त तुझे दोन ॲब्स देशील का’, अशी विनोदी कमेंट एका नेटकऱ्याने केली. तर ‘हा इन्स्टाग्रामवरील फोटो ऑफ द डे आहे’ असं दुसऱ्या युजरने लिहिलं.

हृतिक सध्या त्याच्या आगामी ‘फायटर’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. यामध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोण त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. फायटर हा चित्रपट पुढच्या वर्षी जानेवारीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हृतिक आणि दीपिकासोबतच यामध्ये अनिल कपूरचीही भूमिका आहे.

हृतिकचा ‘विक्रम वेधा’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हृतिकने यावर भाष्य केलं.

“जेव्हा लोक माझी प्रशंसा करतात, तेव्हा मला चांगलं वाटतं. माझ्या कामाचं कौतुक झालेलं मला आवडतं. पण त्यासोबत येणाऱ्या लोकांच्या ज्या अपेक्षा असतात, त्या मला ओझं वाटतात. मला चुकीचं समजू नका. मला ज्या गोष्टी मिळाल्या आहेत, त्यासाठी मी कृतज्ञ आहे. मात्र हे एक असं ओझं आहे, ज्याला मी उचलून चालतोय, असं मला वाटतं. हे ओझं कायम डोक्यावर ठेवण्यासाठी मला सतत कठोर मेहनत करावी लागले. जेव्हा तुमच्याकडून कोणी अपेक्षा ठेवत नाहीत, तेव्हा तुम्ही सुखी असता”, असं तो म्हणाला.