Saba Azad | ऋतिक रोशनची गर्लफ्रेंड वादात, ‘तो’ व्हिडीओ व्हायरल होताच वाढल्या अडचणी, थेट ड्रग्सचा….

ऋतिक रोशन हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. ऋतिक रोशन हा सबा आझाद हिला डेट करतोय. ऋतिक रोशन नेहमीच सबा हिच्यासोबत स्पाॅट होतो. ऋतिक रोशन हा सोशल मीडियावर कायमच सक्रिय दिसतो.

Saba Azad | ऋतिक रोशनची गर्लफ्रेंड वादात, तो व्हिडीओ व्हायरल होताच वाढल्या अडचणी, थेट ड्रग्सचा....
| Updated on: Oct 11, 2023 | 11:10 PM

मुंबई : ऋतिक रोशन हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या चित्रपटांपेक्षा अधिक त्याच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत आहे. ऋतिक रोशन (Hrithik Roshan) हा सबा आझाद हिला डेट करतोय. ऋतिक रोशन आणि सबा आझाद हे कायमच एकसोबत स्पाॅट होतात. ऋतिक रोशन आणि सबा आझाद (Saba Azad) यांची जोडी लोकांना फार काही आवडत नाही. इतकेच नाही तर लोक थेट यांच्या जोडीला मुलगी आणि वडिलांची सुंदर जोडी म्हणतात. नेहमीच सबा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर असते.

काही दिवसांपूर्वीच सबा आझाद ही पापाराझी यांच्यावर भडकताना दिसली. इतकेच नाही तर तिने थेट पापाराझी यांना आपले फोटो काढण्यास मनाई केली. ऋतिक रोशन याला डेट करत असल्यापासून सबा चर्चेत आहे. ऋतिक रोशन याच्या वाढदिवसाच्या दिवशी सबा आझाद हिने सोशल मीडियावर एक अत्यंत खास पोस्ट शेअर केली.

ऋतिक रोशन आणि सबा आझाद हे काही दिवसांपूर्वीच विदेशात धमाल करताना दिसले. ऋतिक रोशन याने सबा आझाद हिच्यासोबतचा एक अत्यंत खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला. विशेष म्हणजे त्या फोटोमध्ये दोघांचाही जबरदस्त असा लूक दिसला. नेहमीच ऋतिक रोशन आणि सबा आझाद हे डिनर डेटला देखील दिसतात.

मध्यंतरी चर्चा होती की, ऋतिक रोशन आणि सबा आझाद हे लग्नबंधनात अडकणार आहेत. मात्र, यांच्या लग्नाबद्दल काही जास्त अपडेट मिळू शकले नाही. आता नुकताच सबा आझाद हिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. सबा आझाद हिचा हा व्हिडीओ पाहून लोक हैराण झाल्याचे बघायला मिळत आहे.

या व्हिडीओमध्ये सबा आझाद ही रॅम्प वॉक करताना दिसतंय. मात्र, सुरूवातीला सबा झुलताना दिसतंय. यामुळेच सबा आझाद ही नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आल्याचे दिसतंय. एकाने कमेंट करत थेट म्हटले की, आज जरा जास्तच झालेली दिसतंय. दुसऱ्याने लिहिले की, या सबा आझाद हिने ड्रग्स घेतले. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट केल्या जात आहेत.