‘हम आपके हैं कौन’च्या शूटिंगचा BTS व्हिडिओ व्हायरल, सीन संपताच माधुरीचा सलमानवरचा राग; लक्ष्मीकांत बैर्डेही चिडले

'हम आपके हैं कौन' मधील सलमान खान आणि माधुरी दीक्षितचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे.त्या व्हिडीओमध्ये सीन कट झाल्यावर माधुरी प्रचंड रागाने सलमान खानकडे पाहत निघून गेली तर त्यात सीनमध्ये असणारे लक्ष्मीकांत बेर्डेही चिडलेले दिसले.

हम आपके हैं कौनच्या शूटिंगचा BTS व्हिडिओ व्हायरल, सीन संपताच माधुरीचा सलमानवरचा राग; लक्ष्मीकांत बैर्डेही चिडले
madhuri dixit
Image Credit source: instagram
| Updated on: May 31, 2025 | 4:14 PM

हिंदी चित्रपटसृष्टीतील 90 मधल्या चित्रपटांबद्दल बोलायला गेलं तर त्यात ‘हम आपके हैं कौन’ या चित्रपटाचं नाव येणार नाही असं होत नाही. ‘हम आपके हैं कौन’ या चित्रपटाला कितीतरी वर्षे पूर्ण झाली आहेत, पण या चित्रपटाची लोकप्रियता अजूनही तशीच आहे. या चित्रपटातील गाणी आजही तेवढीच सुपरहीट आहेत. सलमान खान आणि माधुरी दीक्षितचा हा सुपरहिट चित्रपट गाण्यांसाठी, कथेसाठी आणि कौंटुबिक दृश्यांसाठी ओळखला जातो.

‘धिकताना धिकताना’ या गाण्याच्या शुटींगचा व्हिडीओ व्हायरल

अलीकडेच, चित्रपटाच्या शूटिंगचा एक थ्रोबॅक बीटीएस म्हणजे पडद्यामागील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये, एका डान्स सीनचे शूटिंग सुरु होते त्यात सीन होता तो माधुरी दीक्षित आणि सलमान खानचा. जसं सीन कट म्हणताच माधुरी सलमानवर प्रचंड रागवली आहे असं दिसत होतं कारण तिने फार रागाने त्याचा हात झटकल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.

माधुरी सलमानवर प्रचंड रागवली होती

व्हिडिओमध्ये सलमान आणि माधुरी चित्रपटातील ‘धिकताना धिकताना’ या गाण्याच्या शुटींग करताना दिसत आहेत. या सीनमध्ये एकमेकांसोबत हात धरून तो गाणे शूट करायचे होते. हे दृश्य दोन शॉट्समध्ये चित्रित करण्यात आलं. मात्र सीन संपताच, माधुरी दीक्षितचे भाव बदललेले स्पष्टपणे जाणवत आहे.ती सलमान खानकडे रागाने बघत आणि तिचा हात रागानेच झटकत तिथून लगेच निघून जाताना दिसत आहे. यानंतर, सलमान पुढील सीनसाठी तसाच स्तब्ध उभा राहिलेला दिसत आहे.त्याचा पुढील सीन हा मग अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासह सुरु होतो.


लक्ष्मिकांत बेर्डेही चिडलेले दिसले 

पण माधुरीनंतर जेव्हा लक्ष्मिकांत बेर्डे या सीनसाठी येतात. तेव्हा ते देखील थोडे चिडलेलेच पाहायला मिळत आहे. तेही समोरच्या व्यक्तिला चिडून उत्तर देतानच दिसत आहे. पण पुढे जसं गाणं वाजायला लागतं तसं पुन्हा दोघेही त्या गाण्यावर डान्स करू लागतात. एकंदिरतच या व्हिडीओवरून असं लक्षात येत आहे की या गाण्याच्या शुटींगवेळी नक्कीच काहीतरी बिनसलं असणारं.

नेटकऱ्यांच्या भरभरून कमेंट्स 

दरम्यान व्हिडीओवर नेटकऱ्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने कमेंट केली आहे की “सुरुवातीला माधुरी आणि शेवटी माधुरी दोन्ही पहा” तर, एका युजरने म्हटले आहे की “माधुरी सलमान खानचा हात झटकून अशी का निघून गेली”. या व्हिडिओवर चाहत्यांकडून अनेक कमेंट्स आल्या आहेत.

हम आपके है कौन 5 ऑगस्ट 1995 रोजी रिलीज झाला होता आणि राजश्री प्रॉडक्शनने त्याची निर्मिती केली होती. सूरज बडजात्या दिग्दर्शित हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक आहे. त्याची गाणी आज चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहेत. 6 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 111 कोटी रुपये कमावले.