
Actress Health Update: अभिनेत्री दीपिका कक्कर सध्या गंभीर आजाराचा सामना करत आहे. अभिनेत्री गेल्या काही दिवसांपासून स्वतःच्या आरोग्यामुळे चर्चेत आली. काही दिवसांपूर्वी पती आणि अभिनेता शोएब इब्राहिम याने दीपिकाला कॅन्सर झाल्याचं सांगितलं. आता नुकताच दीपिकावर शस्त्रक्रिया करण्यात आली. 14 तास अभिनेत्रीवर शस्त्रक्रिया सुरु होती. शोएब याने एका ब्लॉगमध्ये दीपिकाच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट दिली आहे.
शोएब म्हणाला, ‘कल ईद अल आधा आणि आजच्या शुभ दिवशी दीपिका आयसीयूच्या बाहेर आली आहे. मी आभारी आहे की ती आहे आयसीयूच्या बाहेर आहे आणि आमच्या सोबत आली. गेल्या तीन दिवसांपासून दीपिका आयसीयूमध्ये होती. सर्जरीनंतर तिच्या प्रकृतीमध्ये सुधारणा देखील होत आहे. डॉक्टरांनी तिला आत जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवस ती आता रुग्णालयातच राहील. कारण सर्जरी मोठी होती. 14 तास दीपिका ओटीमध्ये होती.’
‘सर्व कुटुंबिय चिंतेत होते. कारण पूर्वी कधी इतकी मोठी सर्जरी पाहिली आणि ऐकली नव्हती. सकाळी 8.30 वाजता दीपिकाला दाखल करण्यात आलं होतं आणि रात्री 11.30 वाजता ती ओटीमधून बाहेर आली. आयसीयूमध्ये शिफ्ट केल्यानंतर मी तिला भेटलो… सध्याकाळी आम्ही घाबरलो होतो कारण डॉक्टरांनी कोणतीच अपडेट दिली नाही.’
पुढे शोएब म्हणाला, ‘सुदैवाने डॉक्टरांनी मला आश्वासन दिलं की जरी ते अपडेटसाठी आले नाहीत तरी शस्त्रक्रिया चांगली झाली आणि ती पूर्णपणे बरी होईल. दीपिकाच्या पित्ताशयात एक दगड होता जो शस्त्रक्रियेदरम्यान काढून टाकण्यात आला होता. शिवाय तिच्या लिव्हरचा एक भाग देखील काढला आहे. कारण ट्यूमर कर्करोगाचा होता.’
शोएबने खुलासा केला की, ‘डॉक्टरांनी आम्हाला सांगितले होतं की यकृत हा एक असा अवयव आहे जो कालांतराने स्वतःहून बरा होतो. त्यामुळे त्यावर ताण येण्याची गरज नाही पण आपण सावधगिरी बाळगली पाहिजे आणि चांगली काळजी घेतली पाहिजे.’ सध्या सर्वत्र दीपिकाच्या प्रकृतीची चर्चा सुरु आहे.
दीपिका हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री अनेक मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका बजवाल्या. आज दीपिकाला कोणत्या ओळखीची गरज नाही. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. आता चाहते देखील अभिनेत्रीच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत.