Ibrahim Ali Khan | ‘हा तर 90 च्या दशकातील सैफच’; इब्राहिमच्या शर्टलेस व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव

इब्राहिमचा शर्टलेस अंदाज आणि सिक्स पॅक ॲब्स पाहून नेटकऱ्यांना नव्वदच्या दशकातील सैफ अली खानची आठवण झाली. 'हा तर वडिलांपेक्षाही अधिक हँडसम आणि फिट आहे', असं एकाने लिहिलं. तर 'सैफची झेरॉक्स कॉपी आहे', असं दुसऱ्याने म्हटलंय.

Ibrahim Ali Khan | हा तर 90 च्या दशकातील सैफच; इब्राहिमच्या शर्टलेस व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव
Ibrahim Ali Khan
Image Credit source: Instagram
| Updated on: Jul 31, 2023 | 12:23 PM

मुंबई | 31 जुलै 2023 : सैफ अली खान – अमृता सिंग यांचा मुलगा आणि अभिनेत्री सारा अली खानचा भाऊ इब्राहिम अली खान गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीला ते डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. या दोघांना अनेकदा एकत्र पाहिलं गेलंय. काही दिवसांपूर्वीच इब्राहिम आणि पलक ‘मूव्ही-डेट’ला गेले होते. त्यानंतर आता इब्राहिम त्याच्या एका व्हिडीओमुळे सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. रविवारी जुहूमधील स्पोर्ट्स ग्राऊंडवर तो फुटबॉल खेळताना दिसला. या मॅचनंतर शर्टलेस इब्राहिमचा व्हिडीओ पापाराझींनी शूट केला असून सोशल मीडियावर तो तुफान व्हायरल होत आहे. मैदानातून शर्टलेस बाहेर पडताना इब्राहिमने काही चाहत्यांसोबत सेल्फीसुद्धा क्लिक केले. त्याचसोबत तो पापाराझींनाही नम्रतेने भेटला.

इब्राहिमचा शर्टलेस अंदाज आणि सिक्स पॅक ॲब्स पाहून नेटकऱ्यांना नव्वदच्या दशकातील सैफ अली खानची आठवण झाली. ‘हा तर वडिलांपेक्षाही अधिक हँडसम आणि फिट आहे’, असं एकाने लिहिलं. तर ‘सैफची झेरॉक्स कॉपी आहे’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘हा तर ‘हम तुम’मधला सैफच वाटतोय’, असंही नेटकऱ्यांनी लिहिलं आहे. बहीण सारा अली खानप्रमाणे इब्राहिमने अद्याप बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं नाही. मात्र त्याच्या खासगी आयुष्यामुळे तो सतत चर्चेत असतो.

अभिनेत्री पलक तिवारीने सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पदार्पणाच्या आधी आणि त्यानंतरही पलकला अनेकदा इब्राहिमसोबत पाहिलं गेलं. सर्वांत पहिल्यांदा या दोघांना एका रेस्टॉरंटमधून बाहेर येताना पाहिलं गेलं होतं. त्यावेळी पलकने पापाराझींपासून आपला चेहरा लपवला होता. काही दिवसांपूर्वीच सारा अली खान आणि इब्राहिम हे गोव्यात सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गेले होते. यावेळी भाऊ-बहिणींसोबत पलकसुद्धा होती. एअरपोर्टवर तिघांना पापाराझींनी पाहिलं होतं. सारा आणि इब्राहिम हे दोघं एअरपोर्टवरून एकत्र बाहेर निघाले. त्यानंतर थोड्याच वेळात पलक त्यांच्या मागून निघताना दिसली होती.

2021 मध्ये गायक हार्डी संधूच्या ‘बिजली बिजली’ या म्युझिक व्हिडीओतून पलकने पदार्पण केलं. हे गाणं त्यावेळी तुफान हिट ठरलं होतं. त्यानंतर तिला बऱ्याच पार्ट्यांमध्ये इब्राहिमसोबत पाहिलं गेलं. इब्राहिमसोबतच्या नात्याबद्दल प्रश्न विचारला असता पलक एका मुलाखतीत म्हणाली होती, “शूटिंगमुळे मी खूप व्यग्र असते, त्यामुळे अशा चर्चांकडे लक्ष देण्यासाठी माझ्याकडे वेळ नसतो. माझ्यासाठी हे वर्ष फार महत्त्वाचं आहे. कदाचित अशा चर्चा होणं हा या इंडस्ट्रीचा एक भागच आहे. पण मी माझ्या कामाकडे अधिक लक्ष केंद्रीत करू इच्छिते.”