साऊथसोबत बॉलिवूडमध्येही कमावलं नाव; पण त्या एका आजाराने अभिनेत्री त्रस्त, आता लग्नाविना आई झाल्याने चर्चेत

फोटोतील या चिमुकलीला ओळखलंत का? दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसोबतच तिने बॉलिवूडमध्येही नाव कमावलं आहे. या अभिनेत्रीने एका मुलाखतीत तिच्या आजारपणाविषयी खुलासा केला होता. या आजारपणामुळे तिच्या पायांना सूज आणि जखमसुद्धा व्हायची.

साऊथसोबत बॉलिवूडमध्येही कमावलं नाव; पण त्या एका आजाराने अभिनेत्री त्रस्त, आता लग्नाविना आई झाल्याने चर्चेत
इलियाना डिक्रूझ
Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 01, 2023 | 2:18 PM

मुंबई | 1 नोव्हेंबर 2023 : अवघ्या 19 व्या वर्षी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून आपल्या करिअरची सुरुवात करणारी अभिनेत्री इलियाना डिक्रूझ आज केवळ दक्षिणेतच नाही बॉलिवूड इंडस्ट्रीतही लोकप्रिय आहे. इलियानाचा जन्म 1 नोव्हेंबर 1987 रोजी मुंबईत झाला. तिने मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात केली आणि त्यानंतर ती अभिनयाकडे वळली. ‘देवदासू’ या पहिल्याच दाक्षिणात्य चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण करणारी इलियाना एकेकाळी आजारामुळे त्रस्त होती, हे तुम्हाला माहितीये का? इलियानाला स्लिपिंग डिसॉर्डरने ग्रासलं होतं.

इलियाना सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते आणि तिच्या आयुष्याशी निगडीत बऱ्याच गोष्टी ती त्याद्वारे चाहत्यांसोबत शेअर करते. काही काळापूर्वी तिने स्वत: स्लीप डिसॉर्डरविषयी सांगितलं होतं. इलियानाला झोपेत चालायची सवय होती. या सवयीमुळे तिला अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता. अनेकदा तिच्या पायाला सूज किंवा जखमसुद्धा व्हायची. अखेर बऱ्याच उपचारांनंतर तिने त्यावर मात केली.

इलियाना ही मूळची गोव्याची राहणारी आहे. गोव्यातीलच सेंट झेवियर्स शाळेतून तिने शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर ती मुंबईत आली. 2006 मध्ये तिने ‘देवदासू’ या तेलुगू चित्रपटातून अभिनयाची सुरुवात केली. त्यानंतर 2012 मध्ये तिने अनुराग बासू दिग्दर्शित ‘बर्फी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचं प्रेक्षक-समिक्षकांकडून खूप कौतुक झालं.

इलियाना सध्या चित्रपटांपासून दूर आहे. मात्र खासगी आयुष्यामुळे तिने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. काही दिवसांपूर्वीच तिने गोंडस मुलाला जन्म दिला. मे महिन्यात तिने मायकल डोलन याच्याशी लग्न केलं. इलियाना आणि मायकलने त्यांच्या मुलाचं नाव कोआ फिनिक्स डोलन असं ठेवलं आहे. त्याआधी इलियानाचं नाव अभिनेत्री कतरिना कैफचा भाऊ सेबॅस्टियन लॉरेंट मिशेलशी जोडण्यात आलं होतं. विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्यासोबत हे दोघं पार्टी करतानाही दिसले होते. इलियाना त्याआधी बरीच वर्षे अँड्र्यू नीबोन या ऑस्ट्रेलियन फोटोग्राफरला डेट करत होती. हे दोघं लग्न करणार अशीही चर्चा होती. मात्र 2019 मध्ये त्यांचा ब्रेकअप झाला.