नव्वदच्या दशकाचा बादशाह, एका दिवसात २८ गाण्यांचा वर्ल्ड रेकॉर्ड, अजय देवगण ते ऋषी कपूरनाही दिला आवाज…

बॉलीवुडचे ९० चे दशक गाजवणारे एकमेव गायक ज्यांनी एकाच दिवसात २८ गाणी गाऊन पराक्रम केला होता. अजय देवगन, राहुल रॉय आणि ऋषी कपूर यांना पडद्यावर दिला आवाज...

नव्वदच्या दशकाचा बादशाह, एका दिवसात २८ गाण्यांचा वर्ल्ड रेकॉर्ड, अजय देवगण ते ऋषी कपूरनाही दिला आवाज...
Rishi Kapoor
| Updated on: Nov 18, 2026 | 11:34 PM

नव्वदच्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत केवळ एका गायकाचा दबदबा होता त्यांच्या गाण्याचा चाहता वर्ग प्रचंड मोठा होता. त्यांच्या गाण्याच्या मिलेनियल्सना सुंदर आठवणी आहेत. एवढंच काय तर जेन झी पिढी देखील त्यांची गाणी ऐकत असते. या गायकाचे नाव गिनीज वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदलेले आहे. तेही दोन कारणांनी या गायकाने एका दिवसात २८ गाणी गाऊन इतिहास रचला होतो. १९९३ च्या सर्व चित्रपटात याच गायकाची गाणी होती. या गायकाला गझल गायक जगजीत सिंग बॉलीवूडमध्ये घेऊन आले होते. आता तुम्ही त्यांचे नाव ओळखले असेल…

सानूला लाँच करणारे गझल गायक

आपण कुमार सानू (Kumar Sanu) यांच्याबद्दल बोलत आहोत. त्यांचे खरे नाव केदारनाथ भट्टाचार्य आहे. कुमार सानू यांना बॉलीवूडचे दरवाजे गझल गायक जगजीत सिंग (Jagjit Singh) यांच्यामुळे किलकिले झाले आणि नंतर तर इतिहासच रचला गेला प्रत्येक संगीतकाराला ते हवे होते.

Loading...

18000 गाण्यांना दिला आवाज

कुमार सानू यांनी त्यांच्या करियरमध्ये अनेक भाषेत गाणी गायली आहे. त्यांनी १८००० हजार गाण्यांना आवाज दिला होता. जगभरात म्युझिकल शो केले आहे. त्यांच्या गाण्यांनी म्युझिक लव्हर्स बेभान व्हायचे. मात्र त्यांनी एकाच दिवसात २८ गाणी गाण्याचा विक्रम देखील केला होता. हा विक्रम आजवर कोणी मोडलेला नाही.

kumar sanu

1 दिवसात गायली 28 गाणी

फिल्मी दुनियेत अशी चर्चा आहे की कुमार सानू यांना १९९३ मध्ये एका म्युझिकल टुरला परदेशात जायचे होते. ते या टुरच्या आधी त्यांची कामे उरकणार होते. त्यामुळे त्यांनी एकाच दिवसात २८ गाणी गायली. त्यांची सर्व गाणी कल्ट क्लासिक झाली. हा काळ १९९३ चा होता.

1993 मध्ये कुमार सानूची हीट गाणी

बाजीगर ओ बाजीगर

ये काली काली आंखें

तेरे चेहरे पे

तेरे दर पर सनम

बादलों में छुप रहा चांद

आने वाला कल एक सपना है

सलग पाच वेळा जिंकले फिल्मफेअर

कुमार सानू हे पहिले असे गायक आहेत ज्यांनी सलग पाच वेळा फिल्मफेअर अवॉर्ड जिंकले होते. त्यासाठी देखील त्यांचे नाव गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंदले आहे. सहाव्या वेळी त्यांनी फिल्मफेअर स्वीकारले नाही. त्यांनी म्हटले हे आता अन्य कलाकारांना मिळायला हवे असे म्हणत त्यांनी आपल्या मनाचा मोठेपणाही दाखवला.

ऋषी कपूरसाठी गायली हीट गाणी

कुमार सानू यानी अभिनेता ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांच्यासाठी अनेक गाणी गायली. त्यांनी गायलेली गाणी ऋषी कपूर यांच्या व्यक्तीमत्वाला सुट होत होती. कुमार सानू यांनी ऋषी कपूर साठी, ‘जब से तुमको देखा है सनम’, ‘सोचेंगे तुम्हें प्यार’, ‘तेरी उम्मीद तेरा इंतजार’, आणि ‘गवाह है चांद तारे गवाह है’ सारखी गाणी गायली आहेत जी प्रचंड हीट झाली आहेत.

आशिकीची आठ गाणी हीट्स

९० साली प्रदर्शित झालेल्या म्युझिकल हीट चित्रपट ‘आशिकी’ चित्रपटासाठी कुमार सानू यांनी गायलेली आठच्या आठ गाणी सर्वच्या सर्व सुपर डुपर हीट झाली आहेत. तर ‘फूल और कांटे’ या अजय देवगण याच्या पहिल्या चित्रपटासाठी गायलेली सात गाणी हीट झाली आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us