आधी सवाई आता सायली कांबळे, ‘इंडियन आयडॉल’मध्ये गरिबी दाखवण्याचा अट्टाहास का?, प्रेक्षकांचा संतप्त सवाल!

| Updated on: Mar 22, 2021 | 4:06 PM

सायली कांबळे या नावामुळे सध्या इंडियन आयडॉल हा कार्यक्रम पुन्हा चर्चेत आला आहे. सायली कांबळेला (Sayali Kamble) गरीब दाखवून, कार्यक्रमाने प्रेक्षकांची फसवणूक केली, असा आरोप प्रेक्षकांकडून केला जात आहे.

आधी सवाई आता सायली कांबळे, ‘इंडियन आयडॉल’मध्ये गरिबी दाखवण्याचा अट्टाहास का?, प्रेक्षकांचा संतप्त सवाल!
सायली कांबळे
Follow us on

मुंबई : सध्या कथाबाह्य कार्यक्रमांमध्ये ‘इंडियन आयडॉल’ (Indian Idol 12) या कार्यक्रमाचं 12वं पर्व सरस ठरतंय. यातील स्पर्धक आणि त्यांचे गोड आवाज ऐकून सगळेच रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले आहेत. मात्र, आता अचानक या कार्यक्रमाभोवतीची वाद वलय वाढत चालली आहेत. सायली कांबळे या नावामुळे सध्या इंडियन आयडॉल हा कार्यक्रम पुन्हा चर्चेत आला आहे. सायली कांबळेला (Sayali Kamble) गरीब दाखवून, कार्यक्रमाने प्रेक्षकांची फसवणूक केली, असा आरोप प्रेक्षकांकडून केला जात आहे. या आधीही सवाई भट या स्पर्धकाला गरीब असल्याचे दाखवल्यामुळे हा शो चर्चेत आला होता (Indian Idol 12 contestant Sayali Kamble poverty Controversy).

या कार्यक्रमात प्रत्येक स्पर्धकाचा या मान्चापर्यंतचा प्रवास दाखवण्यात येतो. अशाच व्हिडीओमध्ये सायली अत्यंत गरीब घरातून आली असून, तिचे वडील रुग्णवाहिका चालक आहेत, असे दाखवण्यात आले होते. त्यांच्या घराची परिस्थिती बेताची असल्याचेही तिने म्हटले होते. अभिनेता जॅकी श्रॉफ यांच्या उपस्थितीत झालेल्या भागात सायलीने तिच्या घरी टीव्ही नसल्याचे सांगितले होते. मात्र, आता सायलीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

पाहा ‘या’ व्हिडीओमुळेच होतायत सायलीवर आरोप!

या व्हिडीओमध्ये इंडियन आयडॉल 12ची स्पर्धक सायली कांबळे ही प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांच्यासोबत स्टेजवर गाणं गाताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर ती खरंच इतकी गरीब आहे का?, असा सवाल नेटकरी करत आहेत. त्याचबरोबर ‘इंडियन आयडॉल’मध्ये गरिबी दाखवण्याचा अट्टाहास का?, असा प्रश्नही प्रेक्षक करत आहेत (Indian Idol 12 contestant Sayali Kamble poverty Controversy).

नेटकऱ्यांच्या आणि रसिक प्रेक्षकांच्या मते, जर सायली इतक्या मोठ्या आणि प्रसिद्ध कलाकारासोबत मंचावर गाणं गातेय, तर ती अशीच छोटी-मोठी कलाकार नाही. शिवाय नेटकऱ्यांनी निर्मात्यांना विचारणा केली आहे की, जर कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची निवड आधीपासूनच झालेली असते तर ऑडिशन्स कशासाठी घेण्यात येतात? याआधीही कार्यक्रमाच्या निर्मात्यांवर टीआरपी वाढवण्यासाठी स्पर्धकांना गरीब दाखवण्याचा आरोप करण्यात आला होता.

या आधीही घडला असाच प्रकार!

याच स्पर्धेत सामील असलेला स्पर्धक सवाई भटच्या बाबतीही असाच काहीसा प्रकार करण्यात आला होता. या कार्यक्रमात सवाई भट अतिशय सामान्य गरीब कुटुंबातून आल्याचे दाखवण्यात आले होते. मात्र, त्याचेही काही फोटो सोशल मीडियावर चर्चेत आले होते. त्या फोटोंकडे पाहता सवाई इतका गरीब घरातील नसल्याचे स्पष्ट झाले होते. तसेच आता टीआरपी वाढवण्यासाठी या कार्यक्रमात जेष्ठ गीतकार संतोष आनंद यांचा देखील वापर केला गेल्याचा आरोप केला जात आहे.

(Indian Idol 12 contestant Sayali Kamble poverty Controversy)

हेही वाचा :

Ratris Khel Chale 3 | ‘शेवंता’ पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला, अपूर्वाने फोटो शेअर करत दिले संकेत!

Sooryavanshi | नेटफ्लिक्सवरही दिसणार खिलाडी कुमारचा जलवा, ‘या’ दिवशी ‘सूर्यवंशी’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला!