Sooryavanshi | नेटफ्लिक्सवरही दिसणार खिलाडी कुमारचा जलवा, ‘या’ दिवशी ‘सूर्यवंशी’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) आगामी चित्रपटाची अर्थात ‘सूर्यवंशी’ची चाहते आतुरतेने वाट बघत आहेत. हा चित्रपट गेल्या वर्षी 24 मार्च रोजी प्रदर्शित होणार होता. परंतु, लॉकडाऊनमुळे याचे प्रदर्शन पुढे ढकलले गेले होते.

Sooryavanshi | नेटफ्लिक्सवरही दिसणार खिलाडी कुमारचा जलवा, ‘या’ दिवशी ‘सूर्यवंशी’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला!
सूर्यवंशी

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) आगामी चित्रपटाची अर्थात ‘सूर्यवंशी’ची चाहते आतुरतेने वाट बघत आहेत. हा चित्रपट गेल्या वर्षी 24 मार्च रोजी प्रदर्शित होणार होता. परंतु, लॉकडाऊनमुळे याचे प्रदर्शन पुढे ढकलले गेले होते. त्यानंतर, हा चित्रपट अद्याप प्रदर्शनाची तारीख मिळवण्यात अपयशी ठरला आहे. काही दिवसांपूर्वी ‘सूर्यवंशी’ चित्रपट 2 एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार, असे म्हटले जात होते. परंतु, आता अक्षय कुमारने आपल्या चाहत्यांसमवेत या चित्रपटाची रिलीज डेट शेअर केली आहे. रोहित शेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त चित्रपटाच्या टीमने रिलीजची तारीख जाहीर केली आहे. तसेच, या चित्रपटाविषयी आणखी एक मोठे अपडेट समोर आले आहे (Akshay Kumar upcoming film sooryavanshi rights sold to Netflix).

एक प्रसिद्ध वेबसाईटच्या माहितीनुसार, चित्रपटाच्या स्ट्रीमिंगचे सगळे हक्क आता नेटफ्लिक्सकडे आले आहेत. इतकेच नाही तर नेटफ्लिक्सने 200 कोटींपेक्षा अधिकची डील ऑफर केली आहेत.

नेटफ्लिक्सवर दिसणार ‘सूर्यवंशी’

म्हणजेच, 30 एप्रिलला हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर चाहत्यांना नेटफ्लिक्सवरही बघायला मिळणार आहे. बातमीनुसार, हा चित्रपट 28 मे रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. तथापि, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

200 कोटींच्या आधीही 175 कोटींच्या कराराची चर्चा होती, पण यावर मात्र शिक्कामोर्तब झाला नाही. म्हणजेच या चित्रपटाने रिलीज होण्यापूर्वी बरीच कमाई केली आहे. चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनकडून मेकर्सनाही मोठ्या आशा आहेत. असं म्हणतात की, हा चित्रपट खूप चांगला गल्ला जमवू शकतो (Akshay Kumar upcoming film sooryavanshi rights sold to Netflix).

‘सूर्यवंशी’चे चाहते एका वर्षापासून अधीरतेने वाट पाहत होते. सूर्यवंशी व्यतिरिक्त नेटफ्लिक्सवर ‘बुलबुल तरंग’, ‘जादूगार’ ‘पगलैट’ सारख्या चित्रपटांसह अनेक उत्कृष्ट चित्रपट सादर केले जाणार आहेत. आता अक्षय कुमारच्या ज्या चाहत्यांना थिएटरमध्ये सूर्यवंशीचा आनंद घेता येणार नाही, आता त्यांना घरी बसून हा चित्रपट पाहता येईल.

सुरुवातीला नेटफ्लिक्सनेही दिला होता नकार!

यापूर्वी अशी बातमी आली होती की, सूर्यवंशी टीमने नेटफ्लिक्सशी दिल करण्याचा प्रयत्न केला होता, पण ओटीटी प्लॅटफॉर्मने अक्षयचा चित्रपट खरेदी करण्यास नकार दिला होता. बॉलिवूड हंगामाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी आपल्या अहवालात असे लिहिले आहे की, अक्षयचा चित्रपट सुपरहिट असल्याचे सिद्ध करणे निर्मात्यांचा हा एकच उद्देश आहे. असे मानले जाते की, जर सर्व परिस्थिती सुरळीत झाली, तर अक्षयचा ‘सूर्यवंशी’ सिंगल स्क्रीन आणि नॉन-नॅशनल मल्टिप्लेक्स तसेच नेटफ्लिक्सवर रिलीज होऊ शकतो.

अक्षय कुमार हा सध्या ‘बच्चन पांडे’ या त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये खूप व्यस्त आहेत. त्याचा सूर्यवंशी रिलीजसाठी सज्ज आहे. याशिवाय अक्षय ‘बेलबॉटम’, ‘अतरंगी रे’, ‘रक्षाबंधन’, ‘पृथ्वीराज’, ‘राम सेतू’ आणि ‘हाऊसफुल 5’ सारख्या चित्रपटांमधून आपले मनोरंजन करणार आहे.

(Akshay Kumar upcoming film sooryavanshi rights sold to Netflix)

हेही वाचा :

Video | वीणा नाही, तर शिव ठाकरेचा ‘या’ अभिनेत्रीसोबत रोमान्स, रोमँटिक अंदाजात दिसली जोडी!

Rashmika Mandanna | रश्मिकाच्या नव्या लूकवर चाहते झाले फिदा, लवकरच करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण!