Indian Idol स्क्रीप्टेड आहे का? अखेर हिमेश रेशमियाँने सोडलं मौन; चिडून म्हणाला..

'इंडियन आयडॉल'मध्ये स्पर्धकांचा भावूक प्रवास का दाखवतात? सवाल ऐकताच भडकला हिमेश रेशमियाँ

Indian Idol स्क्रीप्टेड आहे का? अखेर हिमेश रेशमियाँने सोडलं मौन; चिडून म्हणाला..
हिमेश रेशमियाँ
Image Credit source: Instagram
| Updated on: Dec 19, 2022 | 3:00 PM

मुंबई: इंडियन आयडॉल हा रिॲलिटी शो नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकतो. अनेकदा या शोच्या फॉरमॅटवरून प्रश्न उपस्थित केले गेले. यामध्ये दाखवली जाणारी स्पर्धकांची भावूक स्टोरी ही टीआरपीसाठी स्क्रीप्टेड असल्याचा आरोप अनेकांनी केला. इंडियन आयडॉलच्या मंचावर असं का होतं, याचं उत्तर आता शोचा परीक्षक हिमेश रेशमियाँने दिलं आहे. हे उत्तर देताना हिमेशचा रागही अनावर झाला.

का भडकला हिमेश?

इंडियन आयडॉलच्या आगामी भागात नवीन वर्षाचं सेलिब्रेशन होणार आहे. या एपिसोडमध्ये काही लोकप्रिय गायकांनीही हजेरी लावली. या शोच्या एक सेगमेंटमध्ये आरजे मलिष्का परीक्षकांना विविध प्रश्न विचारते. यातील एका प्रश्नावर हिमेशचा राग अनावर होतो.

‘तुम्ही शोमध्ये स्पर्धकांची भावूक कथा का दाखवता’, असा सवाल आरजे मलिष्का करते. त्यावर उत्तर देताना हिमेश म्हणतो, “तुम्ही जेव्हा एखाद्या नोकरीसाठी मुलाखत देता, तेव्हा तुमचं नाव, पत्ता, आधी कुठे काम केलं हे सर्व सांगता. का सांगता? नोकरी देणारासुद्धा हे सगळं विचारतो. तर मग प्रेक्षकांना एखाद्या स्पर्धकाचा बॅकग्राऊंड काय आहे हे जाणून घ्यायचा हक्क असू नये का? तुम्ही माणसातून भावना आणि सहानुभूती काढून टाका, तुम्ही दगड बना.”

हे सर्व बोलताना हिमेशला खूप राग येतो आणि तो रागाने वरच्या स्वरात बोलतो. हिमेश रेशमियाँ इतका का भडकला हे तर प्रेक्षकांना पूर्ण एपिसोड पाहिल्यावरच समजू शकेल. मात्र सध्या सोशल मीडियावर या प्रोमोची खूप चर्चा होतेय.

इंडियन आयडॉल या शोमध्ये 10 स्पर्धकांमध्ये चुरस रंगली आहे. यातील काही स्पर्धक त्यांच्या गायकीमुळे सोशल मीडियावरही चर्चेत आहेत. या शोचा विजेता कोण ठरणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.