भारतीयांचे लज्जास्पद कृत्य!; पाकिस्तानी अभिनेत्रीचे इन्स्टा बॅन झाले म्हणून VPN वापरुन चाहत्यांच्या कमेंट

पाकिस्तानी कलाकरांचे इन्स्टाग्राम अकाऊंटवर भारतात बॅन करण्यात आले आहेत. पण चाहत्यांनी VPN वापरुन कमेंट्स करण्यास सुरुवात केली आहे.

भारतीयांचे लज्जास्पद कृत्य!; पाकिस्तानी अभिनेत्रीचे इन्स्टा बॅन झाले म्हणून VPN वापरुन चाहत्यांच्या कमेंट
Hania Amir
Image Credit source: Tv9 Marathi
| Updated on: May 04, 2025 | 6:50 PM

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून पाकिस्तानविरोधात सतत कठोर निर्णय घेतले जात आहेत. आता भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या शिफारशींनंतर पाकिस्तानच्या अनेक युट्यूब चॅनल्सवर बंदी आणण्यात आली आहे. त्यासोबतच पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंटही बॅन करण्यात आले. पण तरीही काही भारतीय चाहते VPN वापरुन कमेंट्स करताना दिसत आहेत. याबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. अनेकांनी हे भारतीयांचे लज्जास्पद कृत्य असल्याचे म्हटले आहे.

गृह मंत्रालयाच्या शिफारशींनुसार, भारत सरकारने गेल्या आठवड्यात 22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी घटनेनंतर अनेक पाकिस्तानी कलाकरांचे इन्स्टाग्राम अकाऊंट, एक्स अकाऊंट आणि युट्यूब चॅनल्सवर बंदी घातली आहे. भारत, भारताचे लष्कर आणि सुरक्षा एजन्सींविरुद्ध प्रक्षोभक आणि सांप्रदायिकदृष्ट्या संवेदनशील कंटेट, खोट्या गोष्टी आणि चुकीची माहिती पसरवल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे. असे असूनही काही भारतीयांनी पाकिस्तानी कलाकारांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर कमेंट्स करण्यासाठी शक्कल लढवली आहे.
वाचा: ‘… तर मी इंग्लंडला निघून जाईन’ भारत-पाक युद्धावर पाकिस्तानी नेत्याची मजेशीर प्रतिक्रिया

नेटकरी संतापले

टेलीचक्कर या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही स्क्रीनशॉट शेअर करण्यात आले आहेत. या स्क्रीनशॉटमध्ये भारतीय चाहते पाकिस्तानी अभिनेत्री हानियाच्या पोस्टवर कमेंट करताना दिसत आहेत. ते पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. एका यूजरने, ‘किती लज्जास्पद आहे. स्वत:च्या देशापेक्षा तुम्हाला ते कलाकार जास्त महत्त्वाचे आहेत?’ अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एका यूजरने, ‘कृपया या लोकांना पाकिस्तानमध्ये पाठवा’ असे म्हटले आहे.

नेमकं काय केलं?

काही भारतीय चाहत्यांनी पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर कमेंट्स करण्यासाठी VPNचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. एका यूजरने हानिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील पोस्टवर कमेंट करत, ‘हानिया तू काळजी करु नकोस. आम्ही VPNचा वापर करुन आले आहोत’ असे म्हटले आहे. त्यावर हानियाने देखील रिप्लाय देते ‘आता मला रडायला येईल’ असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने, ‘हॅलो हानिया, VPNचे सब्स्क्रीपशन केवळ तुझ्यासाठी घेतले आहे. भारताकडू प्रेम’अशी कमेंट केली आहे. त्यावर हानियाने उत्तर देत ‘लव्ह यू’ असे म्हटले आहे.