Video: पाकिस्तानी नेता घाबरला! भारत-पाक युद्ध झाले तर पळून जायची केली तयारी
"जर युद्ध वाढले तर तुम्ही बंदूक घेऊन सीमेवर जाल का?" या प्रश्नावर पाकिस्तानमधील नेत्याने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

पाकिस्तानचे खासदार (एमपी) आणि इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाचे माजी नेते शेर अफझल खान मारवत हे सध्या चर्चेत आहे. पहलगाम येथील झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या दरम्यान शेर अफझल थान मारवत हे चर्चेत आहेत. त्यांनी सांगितले की, भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध भडकले तर ते इंग्लंडला आश्रयासाठी जातील. त्यांच्या मीडियाशी संवादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पाकिस्तानी स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना मारवत यांना विचारण्यात आले होत की, “पाकिस्तानी म्हणून जर युद्ध वाढले तर तुम्ही बंदूक घेऊन सीमेवर जाल का?” त्यावर उत्तर देत मारवत म्हणाले, “नाही, जर युद्ध भडकले तर मी इंग्लंडला निघून जाईन.” त्यानंतर पत्रकाराने त्यांना विचारले, “या परिस्थितीत, तुम्हाला असे वाटत नाही का की मोदींनी थोडे मागे हटले पाहिजे जेणेकरून परिस्थिती सामान्य होईल?” त्यावर त्यांनी उत्तर दिले की, “मोदी माझ्या मावशीचा मुलगा आहे का, जो माझ्या सांगण्यावर मागे हटेल?” वाचा: ‘याचा अर्थ तुम्ही नालायक…’, पहलगाम हल्ल्यावर वक्तव्य करताना शाहिद आफ्रीदीने ओलांडल्या मर्यादा
Pakistaniyon ki fat ke char ho gayi hai🧵
Journalist : Aapko nahi lagta Modi ko thoda pichhe hatna chahiye
Sher Afzal Khan Marwat, a lawyer and senior #PTI leader : Modi kya meri Khala ka beta hai, jo mere kehne pe ruk jayega😂
Journalist : Agar india ne attack kar diya to?… pic.twitter.com/jNu5H3lzQ1
— KashmirFact (@Kashmir_Fact) April 30, 2025
राजकारणी असण्याबरोबरच, शेर अफझल खान मारवत हे पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात वकील आहेत. ते मानवाधिकार कार्यकर्ते देखील आहेत. दरम्यान, भारताने पाकिस्तानी कलाकारांवर केलेल्या डिजिटल कारवाईच्या प्रत्युत्तरात, पाकिस्तान ब्रॉडकास्टर्स असोसिएशनने (पीबीए) गुरुवारी 22 एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, ज्यामध्ये 26 निरपराध लोकांचा बळी गेला, देशभरातील एफएम रेडिओ स्टेशन्सवर भारतीय गाणी वाजवण्यावर बंदी घातली आहे.
