International Dance Day 2026: माधुरी दीक्षित पासून जान्हवी कपूर पर्यंत, अभिनेत्री बॉलिवूडच्या ट्रेंड डान्सर, तालावर ठेका धरताच घायाळ होतात चाहते

International Dance Day 2026: बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या भन्नाट डान्स करतात. त्यांच्या डान्सचं सर्वत्र कौतुक देखील होत... तर International Dance Day च्या निमित्ताने पाहा माधुरी दीक्षित हिच्यापासून जान्हवी कपूर हिचा भन्नाट डान्स.

International Dance Day 2026: माधुरी दीक्षित पासून जान्हवी कपूर पर्यंत, अभिनेत्री बॉलिवूडच्या ट्रेंड डान्सर, तालावर ठेका धरताच घायाळ होतात चाहते
| Updated on: Apr 29, 2026 | 3:41 PM

International Dance Day 2026: आपल्या भावना प्रकट करण्यासाठी अनेक जण डान्स करतात. जेव्हा आपण प्रचंड आनंदी असतो, तेव्हा आपण मनसोक्त डान्स करतो… विशेषतः कुटुंबिय आणि मित्रांसोबत… या उत्साहाचा आणि या कलाप्रकाराच्या समृद्धीचा गौरव करण्यासाठी, दरवर्षी 29 एप्रिल रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय नृत्य दिन साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय नृत्य दिन पहिल्यांदा 1982 मध्ये साजरा . या निमिकरण्यात आलात्ताने, अशा बॉलिवूड अभिनेत्रींबद्दल जाणून घेऊया, ज्या प्रशिक्षित नृत्यांगना आहेत आणि आपल्या नृत्यकौशल्याने चाहत्यांना मंत्रमुग्ध केलं आणि आजही करतात.

 

 

या यादीमध्ये सर्वात पहिलं नाव अभिनेत्री माधुरी दीक्षित आहे. म्हणजेच बॉलिवूडचा धकधक गर्ल… माधुरी फक्त प्रसिद्ध अभिनेत्रीच नाही तर, लोकप्रिय कथक नृत्यांगना देखील आहे. माधुरी कायम तिच्या डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. आता माधुरी हिचा रियाज करताना एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

 

 

अभिनेत्री जान्हवी कपूर देखील सोशल मीडियावर स्वतःच्या डान्सचे व्हिडीओ पोस्ट करत असते. क्लासिकर डान्स करायला जान्हवी हिला प्रचंड आवडतं. बॉलिवूडच्या अन्य दिग्गज अभिनेत्रींपैकी जान्हवी देखील कथक नृत्यांगना आहे. तिचा डान्स पाहून चाहते तिचं कौतुक करतात.

 

अभिनेत्री सारा अली खान हिचा अभिनय तर भन्नाट आहेच. पण अभिनेत्री डान्स देखील उत्तम करते. सारा कायम डान्स क्लासला जाते. सोशल मीडियावर तिच्या डान्सचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल होत असतात. सध्या सर्वत्र सारा हिच्या डान्सचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

 

 

अभिनेत्री कृति हिला देखील डान्सची प्रचंड आवड आहे. बॉलिवूडच्या क्लासीक गाण्यांवर ती कायम डान्स करते आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करते. तिचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

 

 

अभिनेत्री सान्या मल्होत्रा हिला देखील आता कोणत्या ओळखीची गरज नाही. अभिनेत्री अनेक सिनेमे आणि सीरिजमध्ये देखील महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. ती डान्सर देखील आहे. सान्या कंटेम्परेरी डान्स फॉर्ममध्ये निपून आहे.. तिचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

Follow Us